Advertisement

दसऱ्यापासून मुंबई ते कोल्हापूर धावणार 'शिवशाही'


दसऱ्यापासून मुंबई ते कोल्हापूर धावणार 'शिवशाही'
SHARES

कोल्हापूरकरांच्या पसंतीस उतरलेली एसटी महामंडळाची 'शिवशाही' बस आता कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणार आहे.


३० सप्टेंबरला सुरूवात

ही वातानुकूलित बस कोल्हापूर ते पुणे मार्गानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणार असल्याची माहिती बुधवारी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. येत्या शनिवारी ३० सप्टेंबर रोजी कोल्हापूर आणि मुंबई सेंट्रल वरून एकाचवेळी रात्री १० वाजता या नव्या सेवेला सुरूवात होणार आहे.


कोल्हापूर-पुणे मार्गाला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर ते पुणे मार्गावर मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसला मिळालेल्या प्रवाशांच्या उदंड प्रतिसादाकडे पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या शिवशाही बसलाही प्रवाशांचा असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा रावते यांनी व्यक्त केली.


माफक तिकीट दर

सर्वसामन्यांना परवडेल अशी अत्याधुनिक सोई सुविधा तसेच वातानुकूलित बससेवा एसटी महामंडळाकडून सुरू करण्यात आली. आतापर्यंत मुंबई-रत्नागिरी, पुणे-लातूर, पुणे-कोल्हापूर, पुणे-सोलापूर, रत्नागिरी-कोल्हापूर आणि मुंबई-अलिबाग या मार्गावर 'शिवशाही' धावत आहे. त्यात आता मुंबई-कोल्हापूर या मार्गाचा समावेश होणार आहे. मुंबई-कोल्हापूर शिवशाही बसचे तिकीट ६२० रुपये इतके माफक ठेवण्यात आले आहे.



हेही वाचा -

पहिल्याच दिवशी शिवशाही बस हाऊसफुल्ल

जीएसटीमुळे 'शिवशाही' झाली लेट!

राज्यात एसटीची वातानुकूलित 'शिवशाही' धावणार!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा