Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

Women's Day Special : माथेरानची 'लोको पायलट' राणी!

जगप्रसिद्ध माथेरानच्या राणीचं सारथ्य एका महिलेच्या हाती होतं हे तुम्हाला ठाऊक आहे का?

SHARES

माथेरानची राणी जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक पर्यटक या मिनी ट्रेनने प्रवास करतात. पण या जगप्रसिद्ध राणीचं सारथ्य एका महिलेच्या हाती होतं हे तुम्हाला ठाऊक आहे का? शुभांगी खोब्रागडे यांनी तब्बल दीड वर्ष मिनी ट्रेन चालवली आहे. चला तर मग महिला दिनानिमित्त जाणून घेऊया त्यांचा अनुभव...

शुभांगी खोब्रागडे या माथेरानच्या मिनी ट्रेन चालविणाऱ्य महिला आहेत. शुभांगी या दीड वर्ष मिनी ट्रेनच्या पायलट होत्या. त्यांच्या दीड वर्षाच्या काळात एकही अपघात न झाल्याचं त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तसंच, त्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत 'माझ्या सारखं अनेक महिलांनी यामध्ये काम केलं पाहिजे, कोणत्याही संकटाला न घाबरता त्यांनी काम केलं पाहिजे' असं म्हटलं.

माथेरानमध्ये पर्यटनासाठी गेल्यावर बऱ्याच जणांना मिनी ट्रेननं प्रवास करण्याचा मोह होतो. थंडीच्या दिवसात गारेगार वातारणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये मोठी गर्दी करतात. यावेळी पर्यटक मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाबाहेरून जगप्रसिद्ध मिनी ट्रेननं माथेरानच्या दिशेनं प्रवास करतात. यावेळी पर्यटक सभोवतालचं निसर्ग सौंदर्य अनुभव घेत आनंदीमय प्रवास करतात.

मिनी ट्रेनचा प्रवास हा मजेशीर असला तरी तिचा मार्ग खडतर आहे. घाटातून जाणारी ट्रेन अनेकदा रुळांवर सरकल्याचं चित्र समोर आलं. असं असलं तरी, अनेक पर्यटक या मिनी ट्रेननं प्रवास करतात.हेही वाचा -

Maharashtra Budget 2020: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, स्थानिकांना नोकऱ्यांत प्राधान्य

Maharashtra Budget 2020: स्वस्त घरे, नोकऱ्यांमध्ये प्राधान्य, शेतकऱ्यांना दिलासा आणि बरंच काही…संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा