हायफाय रिक्षावाला

गोवंडी - फ्री वाय फाय, चार्जिंगची सुविधा, फायर किट, फिल्टर पाणी आणि नाश्ता या सर्व सुविधा एका हॉटेलमध्ये नक्कीच मिळतील. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं की या सुविधा तुम्हाला एका रिक्षामध्ये मिळल्या तर... आश्चर्यचकित झालात ना ! विश्वास नसेल बसत तुमचा यावर. पण, हे खरं आहे. सरकार देशाला डिजिटल बनवण्याची स्वप्न बघतेय. पण ऑटो ड्रायव्हर मकबूल खान यांनी मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केलंय. या ऑटोतून प्रवास करणाऱ्याला 4जी चा स्पीड मिळतो. सोबतच चार्जिंगची सुविधा आणि फिल्टर पाणी आणि नाश्ता... प्रवासांसाठी एकप्रकारे चालतं फिरतं हॉटेलच झालीय ही रिक्षा. 

Loading Comments