रविवारी पश्चिम, हार्बरवर मेगाब्लॉक

 Mumbai
रविवारी पश्चिम, हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई - रेल्वे मार्गावरील रूळ दुरूस्तीसाठी आणि तांत्रिक कामासाठी पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागणार आहेत. मात्र मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक नसणार आहे.

पश्चिम रेल्वे

 • पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार
 • गोरेगाव ते बोरीवली स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत ब्लॉक
 • गोरेगाव ते बोरीवली दरम्यानची अप आणि डाउन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर
 • बोरीवलीवरून सुटणाऱ्या लोकल बोरीवली प्लॅटफॉर्म क्रमांक 1, 2, 3, 7 आणि 8 वरून धावणार
 • मेल-एक्स्प्रेस बोरीवलीवरून गोरेगाव आणि अंधेरी स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर धावणार
 • अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार

मध्य रेल्वे

 • मध्य रेल्वेवर कोणातही मेगाब्लॉक नाही.

हार्बर रेल्वे

 • कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लाॅक
 • सकाळी 10.35 ते दुपारी 3.37 वाजेपर्यंत सीएसटी ते पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या स्थानकांदरम्यानची अप आणि डाउन दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद
 • सीएसटी ते कुर्ला अणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार
 • हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर रेल्वेने प्रवास करू शकता
Loading Comments