Advertisement

म्हणून मध्य, हार्बर मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक

हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बरच्या अप-डाऊन या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.३० पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. तर मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ब्लॉक घेतला जाईल.

म्हणून मध्य, हार्बर मार्गावर दोन दिवसांचा विशेष ब्लॉक
SHARES

कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान असलेला पादचारी पूल तोडण्यात येणार असल्याने हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बरच्या अप-डाऊन या दोन्ही मार्गांवर आणि मध्य रेल्वेच्या अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ५.३० पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. तर मध्य रेल्वेच्या डाऊन जलद आणि अप-डाऊन धीम्या मार्गावर रात्री १.३० ते पहाटे ३.३० पर्यंत ब्लॉक घेतला जाईल.

यादरम्यान हार्बर आणि मध्य रेल्वेवरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसचं वेळापत्रक कोलमडणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.


मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान असलेला पूल जुना झाला आहे. या पुलाचं बांधकाम अतिशय जीर्ण झाले आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

ब्लॉकदरम्यान हार्बरच्या वडाळा ते मानखुर्द या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असेल. यादरम्यान पनवेल ते मानखुर्द मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातील. तर हार्बरवरील प्रवासी ट्रान्स हार्बरवरून ठाणे ते वाशी, नेरुळपर्यंत प्रवास करू शकतील.


रविवारच्या या गाड्या रद्द

  • पुणे-सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस
  • मनमाड-सीएसएमटी- मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
  • पुणे-सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
  • मनमाड-सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
  • मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस


या गाड्या दादरपर्यंतच

  • अमृतसर-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस
  • साईनगर शिर्डी-सीएसएमटी मुंबई फास्ट पॅसेंजर
  • कन्याकुमारी-सीएसएमटी जयंती-जनती एक्स्प्रेस
  • हावडा-सीएसएमटी मुंबई मेल
  • गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस

याचसोबत मुंबईत येणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्या उशिरा धावण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा