रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक

  Mumbai
  रविवारी तिन्ही मार्गांवर ब्लॉक
  मुंबई  -  

  उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिनही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे.


  मध्य रेल्वे मार्ग -

  मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.30 ते संध्याकाळी 4.30 वा. दुरुस्तीचे काम करण्यात योईल. परिणामी ब्लॉकदरम्यान माटुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक बंद असेल. ही वाहतूक डाऊन जलद मार्गावरुन वळवण्यात येईल. या गाड्या विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत. या गाड्या मुलुंड स्थानकानंतर पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवल्या जातील. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील जलद गाड्या त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील.


  हार्ब रेल्वे मार्ग -

  हार्बर मार्गावरील नेरुळ ते पनवेल स्थानकांदरम्यान सकाळी 11.20 ते दुपारी 4 या वेळेत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर दुरुस्तीची कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान नेरुळ ते पनवले दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.01 ते संध्याकाळी 4.26 वाजेपर्यंत बंद असणार आहे. ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक नेरुळ ते पनवेल दरम्यान सकाळी 11.04 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत बंद असणार आहे. त्याचसोबत अंधेरी ते पनवेल लोकल गाड्यांची वाहतूक बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते नेरुळ आणि ठाणे ते नेरुळदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.


  पश्चिम रेल्वे -

  पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर स. 10.35 ते दु. 3.35 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे ब्लॉकदरम्यान सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालवण्यात येईल. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत.
  हेही वाचा

  मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत
  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.