रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक


SHARE

मुंबई - रेल्वेच्या पश्‍चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर रविवारी, 18 डिसेंबरला दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेदरम्यान दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जलद मार्गावर हा मेगाब्लॉक आहे. या वेळेत या मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

माटुंगा ते मुलुंडदरम्यानच्या धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं सुरू राहणार आहेत. यामुळे मांटुग्याहून सकाळी 11.12 ते दुपारी 4.27 वाजेपर्यंत सुटणाऱ्या सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहूर वगळता इतर धीम्या मार्गावरील स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. या वेळेत ठाण्याहून सकाळी 11.22 ते दुपारी 3.38 वाजेदरम्यान जलद लोकलला मुलुंड, भांडुप, विक्रोळी आणि इतर स्थानकांवर थांबा देण्यात आलाय.

कुर्ला ते वाशीदरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे सीएसटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यानची दोन्ही बाजूची लोकल सेवा ठप्प राहणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत सेवा पूर्णत: बंद राहील. प्रवाशांच्या सोईसाठी सीएसटी ते कुर्ला व वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या