Advertisement

रविवारी 'मरे' - हार्बरचा मेगाब्लॉक, तर परेचा जम्बोब्लॉक


रविवारी 'मरे' - हार्बरचा मेगाब्लॉक, तर परेचा जम्बोब्लॉक
SHARES

उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २६ नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.


मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दु. ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ब्लॉक दरम्यान मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यानची अप जलद मार्गावरील वाहतूक दिवा आणि परळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.३७ ते दु. ३.५६ वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल. ब्लॉकदरम्यान डाऊन जलद मार्गावरील गाड्यांना सकाळी १०.०५ ते दुपारी ३.२२ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांमध्ये थांबा देण्यात येईल. या लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील.

याचबरोबर ५०१०४ रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच धावणार असून तेथूनच रत्नागिरीसाठी परतीच्या प्रवासासाठी चालवण्यात येणार आहे.


हार्बर मार्गावरील ब्लॉक

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.यादरम्यान सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यानची रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटीएम ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करू शकतात.


पश्चिम रेल्वेचा जम्बोब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर भाईंदर ते वसई रोड स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११ ते दु. ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे. काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.


Read this story in हिंदी
संबंधित विषय