Advertisement

रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक


रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेवर रुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनवर मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

ब्लॉकदरम्यान कल्‍याणहून सकाळी १൦.३൦ ते दुपारी ३.५६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर निघणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्‍थानकादरम्‍यान धिम्‍या मार्गावर चालवण्यात येणार आहे. या गाड्या परळ स्‍थानकापर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील. परळ स्‍थानकापासून या गाड्या अप जलद मार्गावर वळवण्‍यात येतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशि‍राने धावणार आहेत.

छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10.05 पासून ते दुपारी 3.22 वाजेपर्यंत निघणाऱ्या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्‍या निर्धारित थांब्‍याव्यतिरिक्‍त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्‍थानकांवर थांबतील. या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशि‍राने धावणार आहेत. ब्लॉकदरम्यान सीएसएमटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या सकाळी १൦.൦५ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

मुंबईत येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते मांटुगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावरुन चालवण्यात येणार असल्यामुळे त्या २० मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. त्याचबरोबर दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येणार असून दिवा स्थानकातूनच डाऊन दिशेला रत्नागिरीसाठी रवाना करण्यात येणार आहेत. या पॅसेंजरने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दादर ते दिवा स्पेशल ट्रेन दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी चालवण्यात येणार आहे. ही ट्रेन ठाणे स्थानकात दुपारी ४.०६ वाजता तर दिवा स्थानकात ४.१३ वाजता पोहोचणार आहे.


हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी ११.४൦ ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. चुनाभट्टी-वांद्रे ते छत्र‍पति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१൦ ते सांयकाळी ४.१൦ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

शिवाजी महाराज टर्मिनस-वडाळा रोड वरून सकाळी ११.३४ वाजल्‍यापासून ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/ बेलापूर /पनवेल येथे जाणाऱ्या तसंच छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यत बांद्रा/अंधेरीच्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशीवरून सकाळी ९.५३ वाजल्‍यापासून ते दुपारी ३.२൦ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या सर्व सेवा तसेच अंधेरी/बांद्रा वरून सकाळी १൦.४५ वाजल्‍यापासून सायंकाळी ५.൦९ वाजेपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत प्रवास करू शकतात.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा