Advertisement

कोरोनामुळे बंद असलेली मेमू पुन्हा सुरु, पहा वेळापत्रक

यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे बंद असलेली मेमू पुन्हा सुरु, पहा वेळापत्रक
SHARES

कोरोनामुळे मेमूची सेवा बंद करण्यात आली होती. पण शुक्रवारपासून वसई रोड, दिवा, पनवेल ही मेमू पुन्हा सुरळीत सुरु झाली आहे. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्यरेल्वेच्या प्रस्तावानुसार दिवा-वसई रोड मेमू गाडीच्या दररोज ८ फेऱ्या होणार आहेत. वसई रोड-पनवेल मेमू गाडीच्या रोज 6 फेऱ्या होणार आहेत. तर पनवेल दिवा-वसई रोड मेमूच्या शनिवार आणि रविवार वगळता दररोज ८ फेऱ्या होणार आहेत.

कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रवाशांना प्रवास करावा लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना दररोज तिकीट मिळणार आहे. तर दोन डोस घेतलेल्यांना मासिक पास मिळणार आहे.

  • दिवा वसई रोड- सकाळी ५.४९ वाजता , ११.३०, दुपारी २.३३, सायंकाळी ४.२५, ५.५५
  • वसई रोड दिवा- सकाळी ९.५०, दुपारी १२.५५, दुपारी ३.५५, सायंकाळी ५.३५, सायंकाळी ७.१५
  • पनवेल दिवा- सकाळी ८.२५, १०.३०, दुपारी १२.१०
  • दिवा पनवेल- सकाळी ९.२५, सकाळी ११.२०, सायंकाळी ६.४५

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा राज्यसरकारनं दिलेली आहे. परंतु, तरी देखील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कारण मुंबईमध्ये लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे.



हेही वाचा

मुंबई - सिंधुदुर्ग विमानसेवा 'या' तारखेपासून, सर्वसामान्यांना परवडणारी विमानस्वारी

IRCTC ची पहिली क्रूझ सेवा १८ सप्टेंबरपासून सुरू, 'या' ठिकाणांची करा भ्रमंती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा