Advertisement

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होऊनही जुन्याच दरानुसार भाड्याची आकारणी


रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होऊनही जुन्याच दरानुसार भाड्याची आकारणी
SHARES

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होऊन ५ दिवस उलटले तरीही बहुसंख्य रिक्षा-टॅक्सीचालक प्रवाशांकडून जुन्याच दरानुसार प्रवास भाडे घेत आहेत. मीटरमधील भाडेदर बदलासाठी आवश्यक असलेल्या ‘चिप’चा तुटवडा असून मीटरमध्ये बदल करण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचालक पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणांमुळे मुंबई महानगरातील बहुतांश भागांत जुनेच भाडेदर आकारले जात असून प्रवाशांना मात्र दिलासा मिळत आहे.

मुंबई महानगरात १ मार्च २०२१ पासून रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्यात आली. रिक्षा व टॅक्सीचे सुरुवातीचे किमान भाडे तीन रुपयांनी महागले आहे. त्यामुळे रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये झाले आहे. नवीन भाडेदर वसुलीसाठी मीटरमध्ये ३ महिन्यांत आवश्यक बदल करण्याच्या सूचना चालकांना करण्यात आल्या आहेत. तोपर्यंत चालकांना नवीन दरपत्रक दाखवून भाडे वसूल करण्याची मुभाही देण्यात आली आहे. परंतु, अनेकांना अद्याप दरपत्रकही मिळालेले नाही. संघटनांकडून ते घेण्यास चालक उत्सुक नसल्याने प्रवाशांकडून जुन्याच दराने भाडेदर वसुली केली जात आहे.

आरटीओतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन भाडेदरासाठी मीटर रिकॅलिब्रेशन (बदल) करावे लागणार आहे. त्यासाठी मीटरमध्ये एक नवीन चिप बसवावी लागते. यामध्ये मीटरमध्ये पडणाऱ्या भाडेदराची सगळी माहिती साठवून ठेवलेली असते. हे काम परिवहन विभागाकडून काही संस्थांना देण्यात आले आहे. उत्पादकांकडून चिप मिळाल्यानंतर या संस्थांमार्फत मीटरमध्ये चिप बसवून देण्यात येणार आहे. त्यानंतर आरटीओत येऊन चालकाला रिक्षा पासिंग करावी लागेल, परंतु चिपच्या तुटवड्यामुळे पुढील प्रक्रिया रखडली आहे.

वाहनाच्या शेवटच्या क्रमांकानुसार मीटरचे रिकॅलिब्रेशन के ले जाणार आहे. त्यासाठी आरटीओकडूनच तारखा देण्यात आल्या आहे. १ ते ७ मार्चदरम्यान शेवटचा शून्य क्र मांक, त्यानंतर ८ ते १४ मार्चदरम्यान शेवटचा १ क्रमांक असलेल्या रिक्षा, टॅक्सींच्या मीटरमध्ये बदल करण्याच्या सूचना आहेत. १० मे २०२१ पर्यंत बदल होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्याचे ५ दिवस उलटले तरीही एकही रिक्षा, टॅक्सी आरटीओत पासिंगसाठी आली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा