आता मेट्रो-7चाही विस्तार

  Mumbai
  आता मेट्रो-7चाही विस्तार
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आता मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचा सपाटा लावला आहे. त्यानुसार आता मेट्रो-7 चाही विस्तार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून दहिसर ते अंधेरी या मेट्रो-7 मार्गाचा दहिसर-अंधेरी-विमानतळ असा विस्तार करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी पी. आर. के. मूर्ती यांनी दिली आहे.

  मेट्रो-4 चा विस्तार वडाळ्यावरून जीपीओपर्यंत करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने व्यवहार्यता अभ्यास सुरू केला आहे. तर मेट्रो-4 चाच विस्तार ठाण्याच्या दिशेने कासारवडवली ते घोडबंदर असा करण्यात येणार आहे. त्याचवेळी दहिसरपर्यंत धावणारी मेट्रो विस्तारीकरणाच्या माध्यमातून थेट मिरा-भाईंदरपर्यंत धावणार आहे. तर आता विस्तारीकरणात मेट्रो-7 च्या विस्तारीकरणाचीही भर पडणार आहे. भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि या लोकसंख्येने वाहतुकीच्या चांगल्या सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने मेट्रोचे जाळे घट्ट करण्याचा प्रयत्न म्हणून विस्तारीकरण करण्यात येत असल्याचे सांगत एमएमआरडीएने मेट्रो-7 ही विस्तारीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

  अंधेरीपर्यंत धावणारी मेट्रो-7 आता विमानतळापर्यंत धावणार आहे. दहिसर ते अंधेरी या मेट्रो-7 चा मार्ग 16.5 किमी असून, त्यात आता विस्तारीकरणामुळे अंधेरी ते विमानतळ अशा 3 किमीची भर पडणार आहे. त्यामुळे यापुढे मेट्रो- 7 मार्ग 19.5 किमीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6, 208 कोटींचा खर्च असून, विस्तारीकरणामुळे हा खर्च 1500 ते 2000 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.