Advertisement

मेट्रोसाठी महाराष्ट्रात रेड सिग्नल

७ सप्टेंबरपासून मेट्रोची सुरूवात होणार आहे. मात्र महाराष्ट्रातल्या सेवेचा निर्णय हा राज्य सरकार घेणार आहेत.

मेट्रोसाठी महाराष्ट्रात रेड सिग्नल
SHARES

कोरोना काळात येत्या ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मेट्रो सर्विससाठी केंद्र सरकारनं गाइडलाइंस जारी केल्या. ७ सप्टेंबरपासून मेट्रोची सुरूवात होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. मात्र महाराष्ट्रातल्या सेवेचा निर्णय हा राज्य सरकार घेणार आहेत.

महाराष्ट्रातील मेट्रोला अद्याप राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाही. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यांपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे एका महिन्यानंतरच मेट्रोबाबत निर्णय होईल. त्यामुळे तुर्तास तरी मेट्रोला रेड सिग्नल आहे.

गाईडलाईन्सनुसार, दिल्लीतील मेट्रो सेवा एका दिवसात दोन शिफ्टमध्ये धावेल. याला तीन फेजमध्ये सुरू केलं जाईल. यादरम्यान, पाच तासांचा ब्रेक असेल, यात सॅनिटायजेशनचं काम होईल. मेट्रो प्रवास फक्त स्मार्ट कार्डद्वारे करता येईल, टोकन दिलं जाणार नाही. स्मार्ट कार्डसाठी केलं जाणारं पेमेंटदेखील कॅशलेस किंवा ऑनलाइन असेल.

कोरोनामुळे मेट्रो सर्विस मार्चपासून बंद आहे. गृह मंत्रालयानं मागच्या आठवड्यात अनलॉक-4 च्या गाइडलाइंस जारी करत ७ सप्टेंबरपासून फेज्ड मॅनरमध्ये मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. मंगळवारी शहरी प्रकरणांच्या मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी मेट्रो कंपन्यांच्या मॅनेजिंग डायरेक्टर्ससोबत चर्चा केली.



हेही वाचा

महाराष्ट्रात राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी

JEE च्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा