मुंबई मेट्रोचा मीरा भाईंदरपर्यंत होणार विस्तार

  Vidhan Bhavan
  मुंबई मेट्रोचा मीरा भाईंदरपर्यंत होणार विस्तार
  मुंबई  -  

  विधान भवन - मुंबई मेट्रोचा विस्तार करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. मुंबई मेट्रो आता मीरा रोड आणि भाईंदरपर्यंत धावणार आहे. कुलाबा-सीप्झ मार्गावरील मेट्रोचा विस्तार करून विमानतळापर्यंत नेण्यात येणार आहे.

  मीरा रोड-भाईंदरपर्यंत मेट्रो वाढवल्यावर 3 हजार 600 कोटींपेक्षा अधिक खर्च येणार आहे. यासाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांनी या मार्गाचा अहवाल संबधितांना दिला आहे. दहिसर-अंधेरी मेट्रो 16.5 किमी आहे. ती पुढे नेत डी. एन. नगर-चारकोप-दहिसरला जोडली जाणार आहे. दहिसर टोल नाक्यावरून मेट्रो पुढे मीरा रोड-भाईंदरपर्यंत नेण्यात येणार आहे. या घोषणेमुळे मीरारोड-भाईंदरमधील राहिवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण या राहिवाशांना विरार ट्रेन पकडताना खूप मेहनत करावी लागते. तसेच सर्व पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी मेट्रो मीरा रोड-भाईंदरपर्यंत आणावी याची मागणी केली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.