Advertisement

आता तुमच्या गाड्यांच्या स्पीडला नो 'ब्रेक'

स्पीडब्रेकरपासून आता वाहनचालकांची सुटका होणार आहे. या स्पीडब्रेकरमुळेच वर्षाला जवळपास १० हजार प्रवाशांना अपघातात प्राण गमवावे लागतात.

आता तुमच्या गाड्यांच्या स्पीडला नो 'ब्रेक'
SHARES

अनेकदा प्रवास करताना रस्त्यात जास्त प्रमाणात आणि अधिक उंचीचे स्पीडब्रेकर येतात. गाडीचा स्पीड कमी असला तरी अपघात होण्याची शक्यता असते. वेगानं जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा आणि त्याद्वारे अपघाताची शक्यता देखील कमी व्हावी असा स्पीडब्रेकरचा मूळ उद्देश हे मान्य आहे. पण स्पीडब्रेकरची उंची आणि किती अंतरावर दुसरा स्पीडब्रेकर असावा याचासाठी काही तरी नियम असणं आवश्यक आहे. पण असं होताना दिसत नाही.

स्पीडब्रेकरपासून सुटका

आता, या स्पीडब्रेकरपासून आता वाहनचालकांची सुटका होणार आहे. देशातील सर्व महामार्गांवरचे स्पीडब्रेकर हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. विशेषत: टोलनाक्यांजवळचे स्पीडब्रेकर हटवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे

अडथळ्यांविना करा प्रवास

नुकतीच देशात फास्टॅग प्रणाली रस्ते आणि वाहतूक विभागानं लागू केली. यापुर्वी टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना थांबावे लागत होते. पण वाहनांना फास्टॅगमुळे टोलनाक्यावर थांबण्याची आवश्यकता उरली नाही. त्या पार्श्वभूमीवर महामार्गांवरचे स्पीडब्रेकर देखील हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे अडथळ्यांविना प्रवास करणे वाहनांना शक्य होणार आहे.

स्पीडब्रेकरमुळे 'इतके' मृत्यू

२०१७ साली भारताचे कनिष्ठ रस्ते मंत्री पोन राधाकृष्णन यांनी स्पीड ब्रेकरमुळे दरवर्षी अंदाजे १०,००० लोक मरतात अशी माहिती दिली. जर आपण सर्वसाधारणपणे रस्ते अपघातांबद्दल बोललो तर दररोज ४०० हून अधिक लोकं दर ४ मिनिटांला मरतात. 



हेही वाचा

शनिवारपासून सुरू होणार राज्यात रस्ते सुरक्षा अभियान

मध्य रेल्वे स्थानकांत बसवणार २ हजार सीसीटीव्ही

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा