Advertisement

फक्त १० रुपयात मुंबईत ई-बाईक उपलब्ध

जाणून घ्या कुठे आणि कधीपासून?

फक्त १० रुपयात मुंबईत ई-बाईक उपलब्ध
SHARES

सध्या इलेक्ट्रिक गाड्यांना अधिक पसंती मिळत आहे. पेट्रोल आणि डीझेलच्या गाड्यांमुळे पसरणाऱ्या प्रदूषणावर इलेक्ट्रिक वाहन (E-vehicle) हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये देखील सातत्यानं वाढ होत आहे. यासाठीच इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहेत


१० रुपयात इलेक्ट्रिक बाईक

असं असलं तरी इलेक्ट्रिक गाड्या तूर्तास तरी सर्व सामान्यांच्या आवाक्यात नाहीत. या गाड्या महाग असतात. शिवाय भारतात चार्जिंग स्टेशन्सची कमतरता आहे. पण आम्ही आहोत ना! तुमचं हे टेंशन देखील आम्ही कमी करतो. जर तुम्ही बांद्रा कुर्ला भागात राहत असाल किंवा प्रवास करत असाल तर तुम्हाला अवघ्या १० रुपयात इलेक्ट्रिक बाईक मिळू शकते. कशी? त्यासाठी काय करावं लागेल? याची माहिती आम्दी तुम्हाला देणार आहोत


कुणाची संकल्पना?

सध्या नवी मुंबई भागात युलू बाईक्स उपलब्ध आहेत. ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (MMRDA) आणि युलू बाईक्स (Yulu bikes) कंपनीनं एकत्र येऊन ही कल्पना मांडली आहे. -बाईक म्हणजे सोप्या भाषेत बाईक भाड्यानं घेणं, पण इथे पैशांचा व्यवहार ऑनलाईन असतो.


प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी प्रीपेड स्टॅण्ड फायदेशीर



कुठे येणार ई-बाईक्स?

MMRDA च्या आगामी प्रकल्पानुसार बांद्रा आणि कुर्ला स्टेशन परिसरात २५ ते ३० ई-बाईक्स (E-Bikes) ठेवण्यात येणार आहेत. या बाईक्स लॉक असतील. त्या अनलॉक करण्यासाठी युलू अॅप डाऊनलोड करावा लागेल. या अॅपवर आजूबाजूच्या परिसरात ई-बाईक स्टेशन्स कुठे आहेत हे दाखवणारा नकाशा उपलब्ध असेल.


-बाईक्स कशा वापराल?

बाईक अनलॉक करण्यासाठी तुम्हाला १० रुपये फी द्यावी लागेल. पैसे चुकते केले की बाईकवरचा QR कोड स्कॅन करायचा. बाईक अनलॉक होईल. पुढच्या प्रत्येक १० मिनिटांसाठी १० रुपये या हिशोबानं बाईक वापरण्याचं भाडं द्यावं लागेल. बाईक वापरून झाल्यावर ती पुन्हा जवळच्या स्टेशनवर लॉक केली की काम संपलं. या ई-बाईक्स पुढच्या १० ते १५ दिवसात उपलब्ध होतील. सुरुवातीला २५ ते ३० बाईक्स उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर ५०० पर्यंत बाईक्सची संख्या वाढवण्यात येणार आहे. संपूर्ण बीकेसी भागात २५ झोन्स असणार आहेत. या ई-बाईकचा एक फायदा म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असण्याची गरज नाही.

ई-बाईक्समुळे ट्राफिकमध्ये न अडकता तुम्ही इच्छुक स्थळी योग्य वेळी पोहचू शकाल. अपेक्षा आहे की, ही सेवा संपूर्ण मुंबईत राबवली जावी. जेणेकरून मुंबईकर याचा लाभ घेऊ शकतील.  



हेही वाचा

वाहनाला बिनधास्त लावा मराठीतली नंबरप्लेट

रेल्वे प्रवासात झोप लागल्यास 'फोन' उठवणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा