Advertisement

पश्चिम द्रूतगती मार्ग होणार सिग्नल फ्री


पश्चिम द्रूतगती मार्ग होणार सिग्नल फ्री
SHARES

वांद्रे-वरळी सी लिंक वरून सुसाट अंधेरी बोरिवलीकडे निघाल्यानंतर पश्चिम द्रूतगती मार्गावरील विविध जंक्शनवर वेगाला ब्रेक लागतो. सिग्नल आणि वाहतूककोंडीमुळे वेळ जातो. यापुढं मात्र पश्चिम द्रूतगती मार्गावरील ही वाहतूककोंडीची आणि सिग्नल कोंडीची कटकट कायमची दूर होण्याची शक्यता आहे. 

कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए) ने पश्चिम द्रूतगती मार्ग सिग्नल मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएने चाचपणी सुरू केल्याची माहिती महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी दिली आहे.




'इथं' मेट्रोचं काम सुरू

पश्चिम द्रूतगती मार्गाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. सध्या वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या द्रुतगती मार्गाची देखभाल बांधकाम विभाग करत असून अंधेरी ते दहिसर दरम्यानच्या मार्गाची देखभाल एमएमआरडीए करत आहे. शिवाय अंधेरी ते दहिसर दरम्यान मेट्रोचं काम सुरू असून या द्रूतगती मार्गावरील वाहतूक कशी सुसाट करता येईल याचा विचार आता एमएमआरडीएने सुरू केला आहे. त्यातूनच सिग्नल मुक्त द्रूतगती मार्ग करण्याची संकल्पना पुढं आल्याच महानगर आयुक्तांनी सांगितलं आहे.




तरच प्रकल्प मार्गी लागणार

बांधकाम विभागाच्या सहकार्याने संपूर्ण द्रूतगती मार्ग सिग्नल मुक्त करण्याचा हा विचार आहे. तर सिग्नल फ्री मार्ग करण्याकरता अनेक ठिकाणी भुयारी मार्ग बांधण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या हा केवळ एक विचार असून हा प्रत्यक्षात आणता येईल का? यासाठी सल्लागार नेमण्यात येईल. या सल्लागाराने हिरवा कंदील दिला तरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे हे महत्वाचं.



हेही वाचा-

वर्ल्ड बॅँकेचा ४७ एसी लोकलसाठी निधी देण्यास नकार

खूशखबर! ५ मिनिटांत येणार मेट्रो



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा