Advertisement

खुशखबर! पाच मिनिटांत येणार मेट्रो


खुशखबर! पाच मिनिटांत येणार मेट्रो
SHARES

मेट्रोनं प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाशांसाठी एक अानंदाची बातमी अाहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच एमएमअोपीएलनं मेट्रो ट्रेनच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यामुळे एक ट्रेन गेल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या मेट्रोसाठी जास्त वेळ ताटकळत बसण्याची गरज भासणारन नाही. मेट्रो ट्रेनच्या फेऱ्या ३९६ वरून ४४० करण्यात अाल्या अाहेत. त्यामुळे ८ मिनिटांनी येणारी मेट्रो अाता पाच मिनिटांनंतर तुमच्या दिमतीला असणार अाहे.


४४ नव्या सेवा

एमएमअोपीएलच्या अनुसार, ४४ नव्या सेवा सुरू करण्यात अाल्या अाहेत. त्यामुळे ६६ हजार अधिक प्रवाशांना याचा लाभ उठवता येणार अाहे. विशेष म्हणजे, या सर्व फेऱ्या गर्दीच्या वेळी किंवा कार्यालये सुटण्याच्या वेळेस चालविण्यात येणार अाहेत. मेट्रोचं नवं वेळापत्रक २४ सप्टेंबरपासून लागू करण्यात येणार अाहे. १९ सप्टेंबर रोजी याबाबतची यशस्वी चाचणी घेण्यात अाली.


९९.४ टक्के ट्रेन वेळेवर

११.४ किमी लांबीचा वर्सोवा ते घाटकोवर हा मेट्रो-१ मार्ग एमएमअोपीएलच्या अधिपत्याखाली येत अाहे. गेल्या वर्षी मेट्रोनं वेळेवर ट्रेन धावण्याच्या बाबतीत विक्रम नोंदवला होता. वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या ९९.४ टक्के मेट्रो या वेळेवर होत्या.


हेही वाचा -

मुंबई लोकलचं 'शाॅकिंग' सत्य!

महिलांच्या डब्यात अवतरलं मत्स्यालय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा