Advertisement

चेंबूरमध्ये मोनो समोरासमोर, अपघात की बचावकार्य?


चेंबूरमध्ये मोनो समोरासमोर, अपघात की बचावकार्य?
SHARES

रेल्वेत तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडल्याच्या किंवा अपघात घडल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. त्यामुळे मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी 3 हजार कोटी खर्चून 2014 साली मोनोरेलचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला.

पण शनिवारी रात्री अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या मोनोरेलचा मोठा अपघात टळला. वीज पुरवठा खंडित झाल्याने चेंबूर येथे दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजता घडली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. या प्रकारामुळे प्रवाशांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

यावर एमएमआरडीएने मात्र दोन गाड्या समोरासमोर आल्याच नसल्याचे म्हटले आहे. मोनोमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी दुसरी मोनोरेल पाठवण्यात आल्याचे म्हणत एमएमआरडीएने सारवासारव केली आहे.


यापूर्वीही बंद पडली होती मोनो

  • 2015 साली विजपुरवठा खंडीत झाल्याने भक्तीपार्क स्टेशनजवळ मोनोरेल बंद
  • 2016 साली ऑगस्ट महिन्यात चेंबूर ते वडाळादरम्यानची मोनोरेलची वाहतूक तब्बल चार तास बंद पडली होती. भक्तीपार्क स्थानकाजवळच ही मोनोरेल बंद पडली होती. त्यावेळी बंद पडलेल्या मोनोला ओढून नेण्यासाठी दुसरी मोनोरेल पाठवण्यात आली होती.
  • 2016 साली ऑक्टोबर महिन्यात मोनोरेलच्या वडाळा ते जेकब सर्कल या दुसर्‍या टप्प्याचे काम सुरू असताना मोनोच्या ट्रॅकचा काही भाग निखळून रस्त्यावर पडण्याच्या स्थितीत होता. पण स्थानिकांच्या सतर्कतेमुळे हा मोठा अपघात टळला.




हे देखील वाचा - 

मोनोरेल 'गॅस'वर

मोनो रेलच्या सुरक्षेला 'तडे' ?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा