Advertisement

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर स्पीड लिमिट, 'असे' असतील नवे नियम

कोणी नियम मोडला तर त्याला १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर स्पीड लिमिट, 'असे' असतील नवे नियम
SHARES

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेस वेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम मोडला तर त्याला १ हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि पुणे जिल्ह्यातील उर्स टोल प्लाझा दरम्यान जवळपास ५० कि.मी. अंतर आहे. याशिवाय कोणत्याही वाहनास निर्धारित गती मर्यादा पार करण्यासाठी ३७ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागायला नको. या वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावला जाईल आणि ई-चालान पाठवलं जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्टपासून या एक्सप्रेसवेवर गती मर्यादेचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास  हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. तसंच वारंवार अशी चूक केल्यावर दंडाची रक्कम वाढवण्यात येणार आहे. ९४ किलोमीटर लांब असलेल्या या मार्गावर गती मर्यादा १०० किलोमीटर प्रति तास अशी ठेवण्यात आली आहे.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घाट विभागाकडे जाणारा रस्ता जवळपास १५ किलोमीटरचा आहे. गती मर्यादा ताशी ५० किलोमीटर निश्चित केली गेली आहे. हायवे पोलिसांच्या तपासणीत असं आढळलं आहे की सामान्य गाडी चालवताना ५० किलोमीटर अंतर ३७ मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण केलं जाऊ शकतं. जर एखाद्या वाहनानं कमी वेळेत हे अंतर पार केलं आहे तर याचा स्पष्ट अर्थ होतो की, चालकानं ठरवलेल्या कालावधीचं उल्लंघन केलं आहे.



हेही वाचा

लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांनीही ओलांडला २ लाखांचा टप्पा

लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांनीही ओलांडला २ लाखांचा टप्पा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा