लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांनीही ओलांडला २ लाखांचा टप्पा

कलम १८८ नुसार २,०१,१५८ गुन्हे नोंद झाले असून ३१,३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

लाॅकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांनीही ओलांडला २ लाखांचा टप्पा
SHARES

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी पूर्णतहा लाॅकडाऊन (LOCKDOWN) उठवलेला नाही, मात्र तरीही काही बेजबाबदार नागरिकांकडून वारंवार  नियमांचे उल्लंघन केले जात आहे. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होत आहे. बुधवारी या नियम मोडणाऱ्यांनीही २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पोलिसांनी लाँकडाऊनचे उल्लंघन (Violation of lockdown rules ) करणाऱ्यांविरोधात कलम १८८ नुसार  आतापर्यंत २ लाख १ हजार गुन्हे नोंदवलेले आहेत. तर  ९३ हजार १७४ गाड्या जप्त केलेल्या आहेत.  

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत ४२१ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे २२ मार्च ते २१ जूलै  या कालावधीत  कलम १८८ नुसार  २,०१,१५८ गुन्हे नोंद झाले असून ३१,३३२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी  ६ लाख २३ हजार ४४१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले.  कोरोनाशी दोन हात करणाऱ्या  पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र काही माथेफिरून त्यांच्याकामात अडथळा निर्माण करून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवरच हल्ला करत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३१५ घटना घडल्या. त्यात ८८१ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढीलय कारवाई सुरू आहे.

हेही वाचाः- शिवसेनेचे मंत्री फाईल अडवून ठेवतात, काँग्रेस आमदाराची नाराजी

महाराष्ट्र पोलिस (Maharashtra police) विभागाचा  १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,०७,९४० फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ८०५ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Home minister Anil deshmukh )यांनी दिली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

पोलिस कोरोना कक्ष

कोरोना (Coronavirus pandemic) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४८ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५१, ठाणे शहर ७  व ठाणे ग्रामीण २ व १ अधिकारी, रायगड २,पुणे शहर ३, नाशिक शहर १,सोलापूर शहर ३,अमरावती शहर १ wpc,मुंबई रेल्वे ४,नाशिक ग्रामीण ३,जळगाव ग्रामीण १,जालना SRPF १ अधिकारी,नवी मुंबई  SRPF १,पालघर २,ए.टी.एस. १,उस्मानाबाद १,औरंगाबाद शहर १,जालना ग्रामीण १,नवी मुंबई १, अशा ८९ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १८५ पोलीस अधिकारी व १३९८ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सोशल डिस्टेन्सिंग पाळा

 कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टेन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा