Advertisement

दिघे स्थानकासाठी निविदा मागवल्या

दिघे स्थानकात एकूण ४ प्लॅटफाॅर्म आणि एक सब वे असेल. या संपूर्ण स्थानकाचं बांधकाम स्टील फ्रेमवर्कचं असेल. नवीन दिघे रेल्वे स्थानकाचं बांधकाम २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे.

दिघे स्थानकासाठी निविदा मागवल्या
SHARES

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-एेरोली दरम्यान दिघे स्थानकाच्या बांधकामासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागवल्या आहेत. एकूण १०७ कोटी रुपये खर्चून हे स्थानक उभारण्यात येणार आहे. दिघे हे स्थानक मध्य रेल्वे मार्गावरील ७७ वं, तर मुंबई उपनगरीय मार्गावरील ११४ वं स्थानक असेल. याअगोदर डिसेंबर २०१६ मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यान राम मंदिर हे स्थानक उभारण्यात आलं होतं. 


वर्षभर वाट पाहावी लागणार

प्रस्तावित दिघे स्थानकात एकूण ४ प्लॅटफाॅर्म आणि एक सब वे असेल. या संपूर्ण स्थानकाचं बांधकाम स्टील फ्रेमवर्कचं असेल. नवीन दिघे रेल्वे स्थानकाचं बांधकाम २०१९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे. 


आणखी एक स्थानक

दिघे या स्थानका व्यतिरिक्त कोपरखैरणे आणि तुर्भे रेल्वे स्थानकादरम्यान बानकोडे हे स्थानक देखील उभारण्यात येणार आहे. मात्र या स्थानकाच्या बांधकामाला दिघे स्थानकाच्या लोकार्पणानंतर सुरू होणार आहे. ठाणे आणि ऐरोलीपासून ५.७६ किमी अंतरावर हे नवं स्थानक असेल. एेरोली नॉलेज पार्कपासून जवळच हे स्थानक असेल. या स्थानकात ४ प्लॅटफॉर्म आणि एक सबवे असेल.


ऐरोली-कळवा मार्ग जोडण्याची योजना

भविष्यात दिघे ते एेरोली-कळवा हा रेल्वे मार्ग जोडण्याची देखील रेल्वे प्रशासनाची योजना आहे. या रेल्वे मार्गामुळे ठाण्यातील वाहतूककोंडीपासून बचाव होण्यास मदत होईल. याचसोबत ट्रान्स हार्बर ठाणे-वाशी आणि सीएसटी-कल्याण हा मार्ग सरळ जोडला जाईल.  

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा