मुंबई विमानतळाहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या प्रवाशांना आता मुंबई विमानतळ ते पुणे हा प्रवास एसटी महामंडळाच्या बसमधून करता येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळानं या मार्गावर बोरिवली ते पुणे व्हाया मुंबई विमानतळ अशी वातानुकूलित सेवा १६ डिसेंबरपासून सुरू केली आहे. प्रवांशाच्या सोयीसाठी एसटी महामंडळामार्फत शिवनेरी व शिवशाही वातानुकूलित बससेवा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ येथून पुणे व दापोलीसाठी सुरु केली आहे.
शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली-स्वारगेट च्या १७ फेऱ्या व शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली-दापोली च्या ३ फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनस-१ (domestic) इथं गाड्यांचं वेळापत्रकांचा फलक लावण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत लोगो असलेला फलक व राज्य परिवहन महामंडळाची वेबसाईट व टोल फ्री क्र असलेला फलक लावण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी राज्य परिवहनाच्या बस चढ व उतारासाठी थांबणार आहेत, त्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रवाशी थांब्याचा फलक लावण्यात आला आहे. प्रवाशांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी २ सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे. बोरिवली नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी ०२२-२८९३१२२६/०२२-२८९७२३४८ असून, msrtc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंग करता येणार आहे. तसंच, १८००२२१२५० टोल फ्री दूरध्वनी क्रमांकांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिवनेरी (वातानुकूलित) बस बोरिवली-स्वारगेट : सांताक्रूझ टर्मिनस-१ (domestic) येथून सुटण्याच्या वेळा, ५.३०, ६.३०, ७.३०, ८.३०, ९.४५, १०.४५, ११.४५, १२.४५, १३.४५, १४.४५, १५.४५, १६.४५, १७.४५, १८.४५, १९.४५, २०.४५, २१.४५.
शिवशाही (वातानुकूलित) बस बोरिवली-दापोली : सांताक्रूझ टर्मिनस-१ (domestic) येथून सुटण्याच्या वेळा ७.३०, २१.४५, २३.३०, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं अवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आलं आहे.
हेही वाचा -
PMC खातेदारांची मातोश्री बंगल्यासमोर निदर्शने
महापालिका रुग्णालयांतील युरिन पिशव्यांमध्ये गोंधळ