Advertisement

MSRTC Strike : 'या' ST कर्मचाऱ्यांचा मंगळवारी होणार पगार?

कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

MSRTC Strike : 'या' ST कर्मचाऱ्यांचा मंगळवारी होणार पगार?
SHARES

राज्यातील एसटी महामंडळाचे १०० डेपो सुरू झाले आहेत. कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पगार लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्य सरकारनं एक परिपत्रक जारी करुन यासंदर्भात माहिती दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार नियमित कामांवर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे.

दरम्यान, राज्य सरकार सध्या संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्याबाबतचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होण्याची शक्यता आहे. सोबतच मेस्मा लावल्यानं काय परिणाम होणार यावरही कॅबिनेट बैठकीत चर्चा होणार आहे.

सोमवारी ६ डिसेंबर रोजी संपात सहभागी असलेल्या २४५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. तर १० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. सोमवारी (६ डिसेंबर) आलेल्या आकडेवारीनुसार कालपर्यंत ९,६२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं. तर १९९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.



हेही वाचा

येत्या २ वर्षांत १० मोनो धावणार

एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा