Advertisement

४ दिवसांत एसटीला अंदाजे ८८ कोटींचा तोटा


४ दिवसांत एसटीला अंदाजे ८८ कोटींचा तोटा
SHARES

मागील चार दिवस संपावर असलेल्या एसटी कामगरांनी अखेर शनिवारी सकाळपासून कामावर हजेरी लावल्याने एसटी सेवा बऱ्यापैकी सुरळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी हमखास उत्पन्नाच्या काळात म्हणजेच एेन दिवाळीत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांमुळे गेल्या ४ दिवसांत एसटी महामंडळाला किमान ८८ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

हा संप १०० टक्के यशस्वी झाल्याने राज्यभरात दररोज ५७ हजारांहून अधिक फेऱ्या चालविणाऱ्या एसटी महामंडळाच्या हातावर मोजण्याइतक्या बसही रसत्यावर धावल्या नाहीत. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत होणार नफा यावेळी एसटीला झालेला नाही. याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसलेला आहे.


उत्पन्न गमावले

एसटी कामगारंच्या संपामुळे खेडेगावात मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले. कारण ग्रामीण भागातील जनता प्रामुख्याने एसटी बसने आपला प्रवास करत असते. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भाऊबीजेच्या दिवशी एसटी कामगार संप मागे घेऊन कामावर हजर झाले आहेत. या ४ दिवसीय संपात दिवसाला २२ कोटी उत्पन्न घेणाऱ्या एसटीने आपले हातचे उत्पन्न गमावले आहे.


कमी फेऱ्या

शनिवारी संपानंतर पहिल्याच दिवशी सकाळी ८ ते १० च्या दरम्यान ९३२० फेऱ्या झाल्या, तर दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यातील २५१ आगारांतून २४ हजार ५१२ फेऱ्या झाल्या. अर्ध्या दिवसांत एसटीला फेऱ्यांचा निम्मा टप्पा गाठता आला. कारण संपामुळे एसटी बस आपल्या नियोजीत बस आगाराऐवजी इतर ठिकाणच्या आगारात अडकल्या होत्या, अशी माहिती एसटीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्यांने दिली.


उच्च न्यालायाने दिलेल्या समिती नेमण्याच्या आदेश स्वागतार्ह आहे. उच्च स्तरीय अधिकारी संघटनेसोबत चर्चा करुन प्रस्तावित वेतनवाढीवर निर्णय लवकरच घेतील, अशी मी अपेक्षा करतो. संघटनेचे सर्व कामगार शनिवारपासून कामावर हजर झाले आहेत.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी महामंडळ कामगार संघटना


'अशी' हवीय एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ:




हेही वाचा -

'या' कारणामुळे देता येणार नाही एसटीला 7 वा वेतन आयोग

एसटी कर्मचाऱ्यांना पुढची २५ वर्षे ७ वा वेतन आयोग देणं अशक्य - रावते


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा