Advertisement

एसटीच्या ताफ्यात लवकरच 700 नव्या गाड्या


एसटीच्या ताफ्यात लवकरच 700 नव्या गाड्या
SHARES

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी) च्या बसगाड्यांना लालपरी असं संबोधलं जात असलं तरी या गाड्यांची दुरवस्था पाहता लालपरीला प्रवासी संतापून लाल डबा ही म्हणतात. पण आता मात्र लवकरच एसटीच्या ताफ्यातील बसगाड्या चकाचक नव्याकोऱ्या होणार आहेत. कारण एसटीकडून तब्बल 700 नव्या बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे यासाठी राज्य सरकारनं एसटीला मदतीचा हात दिला आहे. त्यानुसार या गाड्यांच्या खरेदीसाठी राज्य सरकारकडून निधी देण्याच्या प्रस्तावाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी हिरवा कंदील दिला आहे.


नव्या गाड्यांची आवश्यकता

‌एसटीची आर्थिक स्थिती बरी असून आता एसटीला नव्या गाड्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे नव्या 500 गाड्या खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडे एसटीने मदत मागितली होती. गुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत एसटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुनगंटीवार यांनी एसटीला मदत करण्याचं मान्य करत एसटीला मोठा दिलासा दिला आहे.


700 नव्या गाड्यांची खरेदी

या बैठकीत पंढरपूर यात्रेसाठीच्या विठाई बससेवेसाठी आणखी 200 गाड्या देण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी तात्काळ मुनगंटीवार यांनी मंजूर केल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आता 500 नव्हे तर 700 नव्या गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. तर त्यासाठीचा निधी राज्य सरकार देणार आहे. ‌


200 कोटी खर्च अपेक्षित

या गाड्या कधी आणि कशा खरेदी करायच्या, कुठल्या आगारासाठी वापरायच्या याचा सविस्तर प्रस्ताव एसटीकडून तयार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नव्या गाड्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वाट पहावी लागणार आहे. दरम्यान या 700 गाड्यांच्या खरेदीसाठी अंदाजे 200 कोटी खर्च अपेक्षित असल्याचंही एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.


हेही वाचा -

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ४ दिवस टोलमाफी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा