Advertisement

दिवाळीपूर्वी MSRTC प्रवास महागणार, तिकीट दरात 'इतकी' वाढ

दिवाळीच्या तोंडावर एसटी मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला.

दिवाळीपूर्वी MSRTC प्रवास महागणार, तिकीट दरात 'इतकी' वाढ
SHARES

ST महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याच महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान, केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाढ केवळ दहा दिवसांसाठी आहे. ही दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि एसी बसेसला लागू राहील. शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे त्या प्रवाशांकडून आरक्षण तिकीट दर आणि नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. 1 नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येईल आणि नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या गाड्यांचा प्रवास महागला

दादर ते स्वारगेट - साधी - सध्या 235, प्रस्तावित - 260

दादर ते स्वारगेट - शिवशाही सध्या 350, प्रस्तावित- 385

मुंबई ते कोल्हापूर - साधी गाडी सध्या - 565, प्रस्तावित - 625 , शिवशाही- सध्या 840, प्रस्तावित - 925

मुंबई ते नाशिक- साधी गाडी सध्या 400, प्रस्तावित 445, शिवशाही- 595, प्रस्तावित 655

मुंबई ते औरंगाबाद- साधी गाडी सध्या- 860 प्रस्तावित - 950, शिवशाही - सध्या 1280 प्रस्तावित - 1410



हेही वाचा

मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

कारमधून प्रवास करणाऱ्या सर्वांना सीट बेल्ट बंधनकारक, 'या' तारखेपासून अमलबजावणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा