Advertisement

कारमधून प्रवास करणाऱ्या सर्वांना सीट बेल्ट बंधनकारक, 'या' तारखेपासून अमलबजावणी

मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे.

कारमधून प्रवास करणाऱ्या सर्वांना सीट बेल्ट बंधनकारक, 'या' तारखेपासून अमलबजावणी
SHARES

मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये याआधी दुचाकीवरीन प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर आता वाहतूक विभागाने कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्येही मोठा बदल केला आहे.

या बदलानुसार आता चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.

दरम्यान, सील बेल्ट बांधणे टाळून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर १ नोव्हेंबर २०२२ पासीन मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ १९४(ब)(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे.



हेही वाचा

मुंबई आणि ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग

मुंबईची मेट्रो लाईन 2A आणि 7 वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा