Advertisement

पूरग्रस्तभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार ३ महिन्यांचा पगार


पूरग्रस्तभागातील एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार ३ महिन्यांचा पगार
SHARES

राज्यभरात पडलेल्या मुसळधार पावसामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथील भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळं अनेक कुटुंबीय बेघर झाली होती. यामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून, त्यांचंही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं. त्यामुळं या एसटी कर्मचाऱ्यांना ३ महिन्याचं वेतन देण्यात येणार आहे.

आर्थिक नुकसान

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व इतर ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यानं अनेक एसटी कर्मचाऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं. त्यामुळं ज्या एसटी कर्मचाऱ्यांचं पूरस्थितीमुळं आर्थिक नुकसान झालं आहे, त्या कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुखाकडं आगाऊ पगारासाठी अर्ज करून पुरामुळं झालेल्या नुकसानीचा तपशील सुंपूर्ण द्यावा.

पूरग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र

नुकसानीचा तपशील दिल्यानंतर महसूल यंत्रणेकडून एसटी कर्मचाऱ्यांना पूरग्रस्त असल्याचा प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यास त्यांना आगाऊ पगार देण्यात येणार आहे. दरम्यान, हा आगाऊ पगार सलग ३६ महिने हप्त्यातून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती एसटी मंडळाकडून देण्यात आली आहे.हेही वाचा -

रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी २५० कोटी रुपये खर्च

विधानसभा निवडणूक २०१९: मुंबईत काँग्रेस २९, तर राष्ट्रवादी ७ जागा लढवणारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा