Advertisement

तंबाखू खाल्ल्यास होईल शिस्तभंगाची कारवाई, एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना दट्ट्या


तंबाखू खाल्ल्यास होईल शिस्तभंगाची कारवाई, एसटी प्रशासनाचा कर्मचाऱ्यांना दट्ट्या
SHARES

तोंडात पान, तंबाखू किंवा गुटख्याचा तोबरा भरून हातवारे करत संवाद साधणं हा चालत्या बसमध्ये टाइमपास करण्याचा सर्वोत्तम पर्याय अशी काही जणांची समजूत असते. यांत अर्थात एसटी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं ठरवलं आहे. त्यासंदर्भातले निर्देश राज्यभरातील सर्व आगार आणि कार्यालयांना देण्यात आले आहेत.


पिचकाऱ्यांनी रंगल्या भिंती

अनेकदा प्रवासादरम्यान एसटी चालक आणि कंडक्टर तोंडात पानसुपारी-तंबाखू, गुटख्याचा तोबरा भरून बसतात. एसटी महामंडळाच्या कार्यालयातही हेच चित्र दिसून येतं. परिणामी एसटी बस, कार्यालयीन इमारतींच्या भिंती पान-तंबाखू, खुटख्याच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या दिसून येतात. या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचं ठरवलं आहे.


कारवाईचे आदेश

महामंडळाने यासंदर्भात नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी पान, तंबाखूचं सेवन करून महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह संचालक मंडळ व अन्य वरिष्ठ स्तरावर चर्चा करण्यास जाऊ नये, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. या आदेशांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावं लागणार आहे.



हेही वाचा-

रिक्षा-टॅक्सीपाठोपाठ अाता एसटीलाही हवीय भाडेवाढ

चोरट्या प्रवाशांमुळे रेल्वेचं ४ हजार कोटींचं नुकसान



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा