Advertisement

लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय, २८ ऑक्टोबरपासून...

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.

लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय, २८ ऑक्टोबरपासून...
SHARES

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता २८ ऑक्टोबरपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबई विभागात उपनगरीय रेल्वे सेवा पूर्वीप्रमाणेच म्हणजेच १०० टक्के क्षमतेने सुरू केली जाणार आहे.

लोकल ट्रेन्समधील प्रवाशांचा वाढता ओघ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.

मागील वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये लोकल सेवा पूर्णपणे खंडीत करण्यात आली होती. त्यानंतर करोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होऊ लागल्यावर अनलॉक प्रक्रीयेदरम्यान लोकल सेवा टप्प्याटप्प्यानं पुन्हा सुरु करण्यात आली. आता ही लोकल सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होत आहे.

सध्या, मुंबई विभागातील सेंट्रल रेल्वे मार्गावर १७०२ आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १३०४ लोकल सुरू आहेत. जी त्याच्या एकूण उपनगरीय सेवांच्या ९५.७०% आहे.

तथापि, २८ ऑक्टोबर २०२१ पासून, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावार १००% सेवा सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे २८ ऑक्टोबरपासून १७७४ आणि १३६७ इतक्या लोकल सुरू होतील.

दरम्यान, लसीकरण न झालेल्यांनाही रेल्वेनं प्रवास करू देण्याची मागणी करणं योग्य कसं?, असा सवाल उपस्थित करत सोमवारी हायकोर्टानं याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.

बाहेरच्या देशातली परिस्थिती आणि लोकसंख्या आपल्यासारखी नाही असा सल्ला देत आईसलँड आणि इस्त्रायलचं उदाहरण देणाऱ्या याचिकाकर्त्यांना हायकोर्टानं चांगलंच सुनावलं.

तसंच प्रशासनानं जे नियम बनवलेत, जे निर्बंध घातलेत ते शास्त्रीय अभ्यास करून सर्वांच्या हितासाठीच आहेत. 'लसीकरणाचा काहीही फायदा नाही हे तुम्ही आम्हाला शास्त्रीय अभ्यासाचा दाखला देत पटवून द्या', असे निर्देश देत मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भातील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.हेही वाचा

बोरिवली-सीएसएमटी लोकल प्रवास लवकरच होणार सुरू

लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ; २२ लाख मासिक पासची विक्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा