Advertisement

लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ; २२ लाख मासिक पासची विक्री

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला मुंबईकरांचा लोकल प्रवास आता पुन्हा सुरू झाला आहे.

लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ; २२ लाख मासिक पासची विक्री
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेला मुंबईकरांचा लोकल प्रवास आता पुन्हा सुरू झाला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. शिवाय, आता काही दिवसांपूर्वी शाळा व कॉलोज सुरू केल्यानं १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठीही लोकल प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रवाशासाठी लोकलचा मासिक पास असणं बंधनकारक आहे. त्यानुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत २२ लाख २५ हजार ६११ मासिक रेल्वे पासची विक्री झाली आहे.

पश्चिम रेल्वेवर दररोज २७ लाख तर मध्य रेल्वेवर ३० ते ३४ लाख असे एकूण ५७ ते ५९ लाख प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. परिणाणी लोकलच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर १५ ऑक्टोबरपासून १८ वर्षांखालील मुलांना आणि मुलींना रेल्वे पासआधारे लोकल प्रवासाची मुभा दिल्यानंतर उपनगरीय लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत आता हळूहळू वाढ झाली आहे. १५ ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती.

लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वसामान्यांना लोकलची दारे खुली होऊन जवळपास २ महिने पूर्ण झाले आहेत. मध्य रेल्वेवर ११ ऑगस्ट ते १८ ऑक्टोबरपर्यंत १५ लाख ४३ हजार १३५ रेल्वे पासची विक्री झाली आहे. तर पश्चिम रेल्वेवर याच काळात ६ लाख ८२ हजार ४७६ रेल्वे पासची विक्री झाली आहे.

उपनगरीय लोकलवर सोमवारपर्यंत एकूण २२ लाख २५ हजार ६११ रेल्वे पासची विक्री झाली आहे. त्यातच १५ ऑक्टोबरपासून १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र दाखवून रेल्वे पास विकत घेऊन लोकलने प्रवास करता येत असल्याने लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा