एसी लोकलचे भाडे स्वस्त करण्यासाठी रेल्वे बोर्डानं तत्वतः मान्यता दिली आहे. एका वृत्तपत्रानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एसी लोकलमध्ये प्रवास करणे सामान्य माणसाला न परवडणारं आहे. कारण चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत सामान्य वर्गाच्या लोकलचे भाडे ५ रुपये आहे. पण एसी लोकलसाठी तेवढ्याच अंतरासाठी ६५ रुपये आकारले जातात.
आता त्याच अंतरासाठी फक्त १५ ते २० रुपये खऱ्च करावा लागू शकतो. कारण रेल्वे बोर्डाकडून भाडे स्वस्त करण्यासाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ८० टक्के मुंबईकर सेमी एसी लोकलसाठी कुठल्याही परिस्थिती तयार होते. तथापि, २३८ एसी लोकललाही तत्वतः मान्यता मिळाली आहे. याचा अर्थ आता सेमी एसी लोकलबाबत स्पष्टता नाही. यापूर्वी सेमी एसी लोकलमध्ये प्रथम श्रेणीचा डबा हटवल्याची चर्चा होती.
मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेनचे आयुष्य २५ वर्षे असते. सध्या जे डबे चालू आहेत, ते २०४० पर्यंत चालू शकतात. रेल्वे अधिकारी म्हणाले की, ज्या लोकलचे आयुष्य संपेल, त्याच्या जागी एसी लोकल येईल.
'हे' असू शकतात नवे दर
अंतर (किलोमीटर) | भाडं (रुपये) |
०-३ | १० |
३-१२ | २० |
१२-१८ | ३० |
१८-२४ | ४० |
२४-३० | ५० |
३०-३६ | ६० |
३६-४२ | ७० |
४२ हूनअधिक | ८० |
हेही वाचा