Advertisement

ख्रिसमस गिफ्ट! एसी लोकल सोमवारपासून धावणार


ख्रिसमस गिफ्ट! एसी लोकल सोमवारपासून धावणार
SHARES

मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षित पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर नाताळच्या निमित्ताने धावण्यासाठी सज्ज झाली आहे. ही एसी लोकल सोमवारी म्हणजेच नाताळच्या दिवशी दुपारी अंधेरी ते चर्चगेट अशी धावणार आहे. २ वाजून १० वाजता ही लोकल अंधेरीहून सुटेल आणि चर्चगेटला २ वाजून ४४ मिनिटांनी पोहोचेल.


किती फेऱ्या?

सोमवार ते शुक्रवार असे ५ दिवस ही एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावेल. या लोकलच्या दररोज १२ फेऱ्या असतील. या १२ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या चर्चगेट ते विरार अशा असतील. ही जलद लोकल मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईंदर आणि वसई रोड (दोन्ही दिशेने) या स्थानकांवर थांबेल.

तर, ३ फेऱ्या चर्चगेट ते बोरीवली अशा चालवण्यात येतील. ही जलद लोकल मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे आणि अंधेरी (दोन्ही दिशेने) या स्थानकांवर थांबेल.

तसेच उर्वरीत १ फेरी महालक्ष्मी ते बोरीवली अशी असेल. ही लोकल धिमी असून सर्व मार्गावर थांबेल.


किती असेल भाडं?

या एसी लोकलचं तिकीट सध्याच्या फर्स्ट क्लासच्या १.३ पट असेल. पण सुरूवातीचे ६ महिने या लोकलचं तिकीट सध्याच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दराच्या १.२ पट असेल. त्यानुसार लोकलचं किमान भाडं ५५ रुपये असण्याची शक्यता आहे.

सध्याच्या फर्स्ट क्लासच्या तिकीटांच्या तुलनेत एसी लोकलचं तिकीट ३० रुपयांनी महाग असेल. त्यानुसार, प्रवाशांना चर्चगेट-वांद्रे प्रवासासाठी ७० रुपये, चर्चगेट-बोरीवली आणि चर्चगेट-विरार प्रवासासाठी अनुक्रमे १४० रुपये आणि १७० रुपये खर्च करावे लागतील.



हेही वाचा-

एसी लोकल नाताळपासून धावणार, सर्व तांत्रिक अडथळे दूर

एसी लोकलचे दर फर्स्ट क्लासपेक्षा कमी?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा