Advertisement

मुंबई एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात, 'इतके' असतील दर

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

मुंबई एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात, 'इतके' असतील दर
SHARES

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आता गारेगार होणार आहे. एसी लोकलने (AC Local) प्रवास करणं सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात आलं आहे.

एसी लोकलच्या भाड्यात ५० टक्के कपात करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास ६५ ऐवजी आता केवळ ३० रुपयांमध्ये करता येणार आहे.

एसी लोकलच्या भाड्यामुळे प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. यामुळे एसी लोकलला पुरेसा प्रतिसादही मिळात नव्हता. प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली. आता अखेरीस प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे.

रावसाहेब दानवे यांनी तिकीट दरात कपात करताना या निर्णयाविषयी सविस्तर माहिती दिली. 'याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसंच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे,' अशी माहिती दानवे यांनी दिली.



हेही वाचा

उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

mumbai"="" target="_blank">Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध">Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा