Advertisement

बोरीवली स्थानकात थांबणार तेजस एक्स्प्रेस

१७ जानेवारीला तेजस एक्सप्रेस आपला पहिला प्रवास सुरू करेल.

बोरीवली स्थानकात थांबणार तेजस एक्स्प्रेस
SHARES

मुंबई-अहमबाद तेजस एक्सप्रेस पुढील महिन्यापासून बोरिवली आणि इतर तीन स्थानकांवर थांबणार आहे. आता तेजस एक्सप्रेस बोरीवली, वापी, भरुच आणि नाडियाद या स्थानकांवर थांबणार असल्याचं रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. आधी ही ट्रेन सुरत आणि वडोदरा या दोन स्थानकांवर थांबवण्यात येणार होती.

१७ जानेवारीला तेजस एक्सप्रेस आपला पहिला प्रवास सुरू करेल. ही गाडी मुंबई सेंट्रल स्थानकातून दुपारी ३.४० वाजता सुटणार आहे. बोरीवली स्थानकात तेजस एक्सप्रेस दुपारी ४.१४ वाजता पोहोचेल. येथे ती २ मिनिटे थांबेल.  त्यानंतर या गाडीचा पुढील थांबा असेल वापी. वापीला गाडी ५.३७ वाजता पोहोचेल. तिसरा थांबा सुरतला गाडी  ६.४७ वाजता पोहोचेल. गाडीचा चौथा थांबा भरूच हा देण्यात आला आहे. भरूचला गाडी ७.२९ वाजता पोहोचेल.

वडोदऱ्याला गाडी रात्री ८.१८ वाजता पोहोचेल. त्यानंतक तेजस नाडियाद स्थानकात ९.०३ वाजता पोहोचेल. अहमदाबादला ही गाडी रात्री ९.५५ वाजता पोहोचेल. गाडीचा अहमदाबादवरून परतीचा प्रवास सुरू पहाटे ६.४० वाजता होईल. तेजसची मुंबईत पोहोचण्याची वेळ दुपारी १.१० वाजताची आहे. 



हेही वाचा -

...म्हणून बेस्टला सहन करावा लागतोय आर्थिक तोटा

'डेक्कन क्विन'चा प्रवास होणार आणखी जलद




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा