Advertisement

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन, संपूर्ण काम ठप्प

नियोजित फ्लाईट्स बुकिंग केलं असताना मुंबई एअरपोर्टवर चेक इनसाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन, संपूर्ण काम ठप्प
SHARES

देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मागील 20 मिनिटांपासून चेक इन करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. नियोजित फ्लाईट्स बुकिंग केलं असताना विमानतळावर चेक इनसाठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा प्रॉब्लेम झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही तांत्रिक अडचण सोडविण्यासाठी विमानतळ प्रशासन पूर्णपणे काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत करण्यात येईल, असं विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

विमानतळाचे सर्व्हर पूर्णपणे डाऊन झाल्यामुळे प्रवासी डेटासंबंधी संपूर्ण काम ठप्प झाले आहे. प्रवाशांची तपासणी, बॅगेज काऊंटर, चेक इन, बोर्डिंग पास देणे सारे काही थांबलेले आहे.

या संदर्भात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन असल्याने गर्दी सामान्यपेक्षा थोडी जास्त आहे. गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित केले जात आहे आणि मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही असे म्हटले आहे. 



हेही वाचा

Mumbai Traffic Update: मुंबईत 2 डिसेंबरला वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जाहीर, वाचा कुठले रस्ते बंद

महापरिनिर्वाण दिन: ६ डिसेंबरला 'या' मार्गावर १२ विशेष लोकल सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा