Advertisement

...म्हणून मुंबई विमानतळ प्रशासनाकडून 3.5 तास लवकर पोहोचण्याचा सल्ला

विमानतळ प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.

...म्हणून मुंबई विमानतळ प्रशासनाकडून 3.5 तास लवकर पोहोचण्याचा सल्ला
SHARES

सणासुदीचा हंगाम जवळ आला आहे. या काळात मुंबईकर वेकेशन मूडमध्ये असतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासंदर्भातच विमानतळ प्रशासनाकडून काही मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत.

विमानतळ अधिकार्‍यांनी आंतरराष्ट्रीय स्थळी प्रवास करणार्‍या सर्व प्रवाशांना त्यांच्या बोर्डिंग वेळेच्या किमान 3.5 तास आधी पोहोचण्याची विनंती केली आहे. तर देशांतर्गत प्रवाशांना त्यांच्या बोर्डिंग वेळेच्या किमान 2.5 तास आधी पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही शेअर करण्यात आला आहे.


हेही वाचा

Traffic Update: माहिममधील वाहतूक मार्गात 18 डिसेंबरपर्यंत बदल, 'हे' मार्ग बंद


"छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सणासुदीचा हंगाम सुरू झाल्याने आधीच प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे आणि येत्या आठवड्यात ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्ही आमच्या सर्व प्रवाशांना विनंती करतो की, विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना संबंधित औपचारिकता आणि अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉलसाठी अतिरिक्त वेळ द्यावा."

ते पुढे म्हणाले, "आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या नियोजित उड्डाणाच्या किमान 3.5 तास अगोदर विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला दिला जातो. देशांतर्गत उड्डाणे घेणाऱ्या प्रवाशांना किमान 2.5 तास अगोदर नियुक्त टर्मिनलवर पोहोचण्याची विनंती केली जाते."

गेल्या वर्षी, ऑक्टोबरमध्ये, अशीच गर्दी विमानतळावर होती. अनेकांना सुरक्षा तपासणीसाठी बराच वेळ रांगेत थांबावे लागले आणि त्यामुळे त्यांची उड्डाणे चुकवावी लागली.



हेही वाचा

mumbai"="" target="_blank">Mumbai Local News: लवकरच हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार">Mumbai Local News: लवकरच हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार

नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या वेळेत बदल, 'या' वेळेत धावणार ट्रेन

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा