Advertisement

प्रवासादरम्यान स्तनपान करणाऱ्या मातांसाठी 'या' रेल्वे स्टेशन्सवर नर्सिंग पॉड्स

भारतीय रेल्वेच्या मुंबई विभागाने सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर 13 अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स बसवल्याची घोषणा केली आहे.

प्रवासादरम्यान स्तनपान करणाऱ्या मातांसाठी 'या' रेल्वे स्टेशन्सवर नर्सिंग पॉड्स
SHARES

स्तनपान (Breastfeeding) करणा-या महिलांसाठी रेल्वेने एक उपक्रम हाती घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या मुंबई विभागाने सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर 13 अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स बसवल्याची घोषणा केली आहे. 

नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर फीडिंग अँड रेस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर फॉर स्टेशन्स (NINFRIS) धोरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या पॉड्समध्ये मातांना त्यांच्या अर्भकांना स्तनपान करण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असेल.

योजनेअंतर्गत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे एक नर्सिंग पॉड स्थापित करण्यात आला आहे, तर दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे प्रत्येकी तीन स्थापित केले आहेत. ठाणे येथे दोन नर्सिंग पॉड उभारले जातील आणि कल्याण आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एक असेल.

लोणावळ्यात लवकरच दोन नर्सिंग पॉड असतील. या धोरणात्मक वितरणाचे उद्दिष्ट संपूर्ण मुंबई विभागातील स्तनपान करणाऱ्या महिलांच्या गरजा पूर्ण करणे आहे.

प्रत्येक नर्सिंग पॉडमध्ये विविध सुविधा असतील. आरामदायी उशी असलेली बसण्याची जागा, डायपर बदलण्यासाठी  स्टेशन, पंखा, लाईट्स आणि एक डस्टबिन असेल. या सुविधांची देखभाल परवानाधारक सेवा प्रदात्याकडून केली जाईल.

या नर्सिंग पॉड्स आर्थिकदृष्ट्या टिकाऊ आहेत याची खात्री करण्यासाठी, प्रत्येक पॉडच्या बाजूने कराराच्या संपूर्ण कालावधीसाठी परवानाधारकांकडून जाहिराती प्रदर्शित केल्या जातील. या जाहिराती केवळ देखभालीसाठी महसूल मिळवण्यास मदत करतील असे नाही तर त्या आकर्षक पद्धतीने सादर केल्या जातील.

बाळासह उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणे हे एक अत्यंत कठीण काम आहे, विशेषत: मुंबई लोकलमधील प्रवाशांना दररोजच्या गर्दीच्या वेळी होणारा गोंधळ लक्षात घेता. त्यामुळे, मातांसाठी हे नर्सिंग पॉड्सअपयोगी ठरतील यात काही शंका नाही. 



हेही वाचा

महिलांसाठी कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष बंधनकारक

रेल्वेच्या बेबी बर्थच्या रचनेत बदल, महिलांचा प्रवास सुकर होणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा