Advertisement

संतप्त बेस्ट बस कंडक्टरचे आज आंदोलन, 'या' निर्णयाचा विरोध

बेस्ट वर्कर्स संघटनेकडून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

संतप्त बेस्ट बस कंडक्टरचे आज आंदोलन, 'या' निर्णयाचा विरोध
SHARES

तिकीट वितरण यंत्र (ईटीआय मशीन) नादुरुस्त झाल्यास वाहकाच्या वेतनातून त्याची रक्कम कापण्याचा अजब निर्णय बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाने घेतला आहे. याचा निषेध करण्यासाठी बेस्ट वर्कर्स संघटनेकडून मंगळवारी वडाळा आगारात निदर्शने करण्यात येणार आहेत.

"तांत्रिक समस्या असल्याने कर्मचाऱ्यांना दंड करण्यात अर्थ नाही. त्यासाठी कंडक्टरला जबाबदार कसे धरायचे? हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही मंगळवारी वडाळा बस डेपोवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिकात्मक निषेध. प्रशासनाने निर्णय न बदलल्यास आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू, असे बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

काही बेस्ट आगारांमध्ये वाहकांकडून तिकीट वितरण यंत्र परत घेत असताना त्याचे कव्हर, यंत्राच्या दर्शनी भागाच्या सुरक्षेसाठी असलेले संरक्षक पारदर्शक प्लास्टिक आवरण कापून टाकण्यात आल्याचे तिकीट आणि रोख रक्कम विभाग कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले.

आवरण काढून टाकण्यात आल्याने यंत्राचा दर्शनी भाग खराब होणे, यंत्र बॅगमधून खाली पडण्याची तसेच पावसाळ्यात प्लास्टिक आवरणाअभावी ते भिजून नादुरुस्त होण्याची शक्यता असल्याचे काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

यंत्र नादुरुस्त झाल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरोधात कारवाई केली जाणार असून नादुरूस्त झालेल्या सुट्ट्या भागाची किंमत कर्मचाऱ्याच्या वेतनातून कापण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या यंत्राच्या वेगवेगळ्या भागांच्या किंमतीनुसार कपात करण्यात येणाऱ्या वेतनाचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

  • यंत्राचे कव्हर किंवा बॅग मागील कव्हर : 1582 रुपये
  • बॅटरी कव्हर : 1105 रुपये
  • बॅटरी : 2214 रुपये
  • थर्मल प्रिंटर : 1803 रुपये
  • एलसीडी आणि पुढील बाजूस असणारे आवरण : 4737 रुपये
  • मेनबोर्ड : 8438 रुपये
  • वायफाय अँटिना ब्रॅकेट : 960 रुपये
  • पेपर फ्लॅप : 960 रुपये
  • युफसी केबल : 538 रुपये

या निर्णयाविरोधात ११ ऑक्टोबरला वडाळा आगारात दुपारी तीन वाजता कर्मचारी आंदोलन करणार असल्याचे बेस्ट वर्कर्स संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

“ज्या प्रकरणांमध्ये मशीन्स गैरवापरामुळे खराब झाल्याचे आढळून आले तेव्हाच या आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. तांत्रिक समस्या किंवा साहित्यातील दोष यासारख्या नुकसानीच्या बाबतीत, शुल्क आकारले जाणार नाही,” बेस्टच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.हेही वाचा

मुंबईकरांसाठी 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन' 1 ऑक्टोबरपासून सेवेत, हे आहे वेळापत्रक

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 5 हजार ई-बाईक, बेस्टची मोठी घोषणा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा