Advertisement

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 5 हजार ई-बाईक, बेस्टची मोठी घोषणा

बेस्टकडून मुंबईकरांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईकरांच्या सेवेत लवकरच 5 हजार ई-बाईक, बेस्टची मोठी घोषणा
SHARES

बेस्टकडून मुंबईकरांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता संपूर्ण मुंबईत बेस्टकडून ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार आहे. ऑक्टोबरपासूनच ही सुरु होणार असून १८० बस थांब्यावर तसेच व्यावसायिक आणि निवासी भागात तब्बल हजार ई-बाईक तैनात करण्यात येणार आहेत.

अंधेरी, विलेपार्ले, जुहू, दादर, माहिम या भागात ई-बाईकची सेवा दिली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण मुंबईत या सेवेचा विस्तार केला जाणार आहे. सध्या मुंबईत व्होगो अशी सेवा दिली जातेय आणि याच धर्तीवर अशी सुविधा राज्यभरात दिली जाणार आहे.

ई-बाईकचे फायदे

  • व्यावसायिक आणि निवासी भागात प्रमुख बस थांब्यांवर व्यवस्था
  • अत्यंत परवडणारे भाडे. मूळ भाडे फक्त 20 रुपये, प्रति किमी प्रवासासाठी 3 रुपये आणि 1.50 रुपये प्रति मिनिट.
  • सुरक्षित वेग. शहरातील प्रवासांसाठी अत्यंत सुरक्षित असा 15 किमी प्रति तास पर्यंत मर्यादित आहे.
  • वायू किंवा ध्वनी प्रदूषण होणार नाही. ई-बाईक कोणत्याही प्रकारचे वायू किंवा ध्वनी प्रदूषण करत नाहीत.
  • गर्दी कमी असलेल्या रस्त्यावरील प्रत्येकासाठी जलद प्रवास.

ई-बाईक चालवण्यासाठी परवाना आवश्यक नाही

बेस्ट कडून सेवेत आणल्या जाणाऱ्या या ई-बाईक वोगो कंपनीच्या आहेत. या बाईकची गती कमी असल्याने याला चालवण्यासाठी चालक परवान्याची आवश्यक नाही. या बाईकचा लाभ सर्वसामान्यांना घेता येणार आहे. तसेच ही बाईक गिअरलेस आहे.

बाईक अनलॉक करण्यासाठी आणि चालवण्यासाठी Voga या वापर आणि नंतर फेरी संपल्यानंतर त्यांना पुन्हा लॉक करता येईल. चलो अॅपच्या माध्यमातून तुम्ही ही बाईक भाड्याने घेऊ शकता. यासाठी तुम्ही ओनलाईन युपीआयच्या माध्यमातून भाडयाची रक्कम देऊ शकता.



हेही वाचा

CSMT सोबतच ‘या’ दोन स्थानकांचं रुपडं पालटणार! प्रवाशांसाठी 'या' सुविधा

1 ऑक्टोबरपासून ऑटो, टॅक्सी भाडेवाढ लागू, जाणून घ्या नवीन दर

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा