Advertisement

लोकलसह मेल-एक्स्प्रेस ३ मे पर्यंत बंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर लगोलग रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार, सर्व प्रवासी रेल्वे सेवा ३ मेच्या मध्यरात्री पर्यंत बंद राहणार आहे.

लोकलसह मेल-एक्स्प्रेस ३ मे पर्यंत बंद
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम असल्याची घोषणा केली. मंगळवारी जनतेला संबोधित करताना मोदी यांनी याबाबत स्पष्ट केलं. त्यामुळं आता लोकलही ३ मेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला आहे. लोकलसह मेल-एक्स्प्रेस रद्द देखील बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात मालवाहतूक आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱ्या पार्सल रेल्वे सुरूच राहणार आहेत.

रद्द झालेल्या रेल्वेच्या तिकिटांचे पैसे प्रवाशांच्या खात्यात जमा होणार आहे. तर तिकीट खिडकीवरून काढलेल्या तिकिटांचा परतावा ३१ जुलैपर्यंत घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर लगोलग रेल्वे मंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार, सर्व प्रवासी रेल्वे सेवा ३ मेच्या मध्यरात्री पर्यंत बंद राहणार आहे. यात मेल-एक्स्प्रेस, प्रीमिअम ट्रेन, मुंबई उपनगरीय रेल्वे, कोलकाता मेट्रो आणि कोकण रेल्वेचा समावेश आहे.

यापूर्वीच आयआरसीटीसी संचलित खासगी मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेससह अन्य २ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा केली आहे. देशाच्या विविध भागांत वस्तू पुरवण्यासाठी मालगाड्या आणि जीवनावश्यक वस्तूंची जलद गतीने ने-आण करण्यासाठी पार्सल रेल्वे या पुढेही सुरूच राहणार आहे, असं रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.

अनारक्षित आणि प्रवासी आरक्षण केंद्रातील सर्व तिकीट खिडक्या पुढील आदेश येईपर्यंत बुकिंगसाठी बंद राहणार आहेत. पुढील आदेशांपर्यंत ई तिकिटांसह गाड्यांच्या तिकिटांचं आगाऊ आरक्षण होणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत ३ मे नंतरच्या ई तिकिटांसह कोणत्याही प्रकारची बुकिंग केली जाणार नाही. तथापि, ऑन लाइन रद्द करण्याची सुविधा कार्यरत राहणार आहे .

रद्द केलेल्या गाड्यांच्या आरक्षणासाठी संपूर्ण परतावा मिळेल. अद्याप रद्द न झालेल्या गाड्यांच्या तिकिटांचे आगाऊ आरक्षण रद्द करणाऱ्यांना देखील पूर्ण परतावा मिळेल. ३ मे २०२० पर्यंत रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या ऑनलाइन तिकीटांचा परतावा रेल्वेमार्फत ग्राहकांना ऑनलाइन स्वयंचलितपणे पाठविला जाणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा