Advertisement

मुंबईची बत्ती गुल, लोकल सेवाही ठप्प


मुंबईची बत्ती गुल, लोकल सेवाही ठप्प
SHARES

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मध्य, सेंट्रल आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक जागच्या जागी ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना लोकलमध्येच खोळंबून राहिले.

सोमवारी सकाळी दहा साडेदहा वाजेच्या दरम्यान मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक भागातील वीज पुरवठा अचानक खंडित झाला. आठवड्याचा पहिलाच दिवस असल्यानं आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यानं अनेकांचा कामाचा खोळंबा झाला. टाटाकडून करण्यात येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यानं वीज पुरवठा खंडित झाल्याचं बेस्ट म्हटलं आहे.

सर्व रेल्वे स्थानकांवर लोकल एकामागोमाग एक उभ्या असून, प्रवाशांना स्थानकात थांबून राहावं लागलं आहे. त्याशिवाय इंटरनेट सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामं ठप्प झाली आहे. 

मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात येत आहेत.

सोमवारी सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. घाटकोपर परिसरातही वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा