Advertisement

'या' तारखेनंतर मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार?

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शुभ संख्येत मिळत आहे.

'या' तारखेनंतर मुंबई लोकल सर्वांसाठी सुरू होणार?
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय घट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता शुभ संकेत मिळत आहे. ते म्हणजे, राज्यात १ जूनपासून लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात येणार आहेत. याबाबत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संख्येत दिले आहेत. शिवाय, मुंबई उपनगरीय लोकल सेवेबाबत त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

१ जूनपासून निर्बंध शिथील होणार असले तरी लोकल प्रवासावरील निर्बंध मात्र कायम राहणार आहेत, असे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यात एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. दैनंदिन रुग्णसंख्या तब्बल ७० हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली. त्यामुळे राज्य सरकारने कठोर पावले उचलत लॉकडाऊन सारखे कठोर निर्बंध लादले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी राज्याला संबोधित करत संचारबंदीसह निर्बंधांची घोषणा केली.

१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून लादण्यात आलेले हे निर्बंध आठवडाभरानंतर अधिक कठोर करण्यात आले. त्यानंतर निर्बंधांचा कालावधी सातत्याने वाढवला जात असून आता १ जून रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू आहेत. या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक या प्रमुख शहरांमध्ये रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. त्यातूनच १ जूनपासून काही प्रमाणात निर्बंध शिथील होतील अशी आशा निर्माण झाली आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना माहिती दिली.

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असली तरी काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेत रुग्णवाढ होत असलेले जिल्हे रेड झोनमध्ये टाकून तेथील निर्बंधांबाबत एकंदर स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल व उर्वरित जिल्ह्यांत निर्बंध शिथील केले जातील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

या भागातील आस्थापना तसेच अन्य व्यवहार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यात लोकलसेवेबाबत मात्र कोणताही दिलासा मिळणार नाही, असेच दिसत आहे. लोकलसेवेबाबत विचारले असता १ जूनला मुंबईतील निर्बंध शिथील करण्यात आले तरी पुढचे किमान १५ दिवस सर्वसामान्यांसाठी लोकल खुली केली जाणार नाही, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे लोकलबाबत तूर्त निर्णय घेतला जाणार नाही. लोकल सर्वांसाठी खुली केल्यास पुन्हा गर्दी होईल हे निश्चित आहे. म्हणून स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यावरच त्याबाबत विचार केला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा आहे. ती यापुढेही कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले.


हेही वाचा - 

मुंबईतील तीन कोविड सेंटर १ जूनपर्यंत बंद, नवीन रुग्णांना प्रवेश नाही

कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली दीपिका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा