Advertisement

‘मेट्रो ७ आणि २अ’ने पार केला ३ कोटी प्रवाशांचा टप्पा

दरम्यान, मेट्रो लाईन 2A आणि 7 वरील सर्वात कमी दोन रहदारी असलेली स्थानके आहेत जी गोरेगाव (प) आणि देवीपाडा आहेत ज्यात दररोज अनुक्रमे 2430 आणि 1887 प्रवासी येतात.

‘मेट्रो ७ आणि २अ’ने पार केला ३ कोटी प्रवाशांचा टप्पा
(File Image)
SHARES

आनंद नगर ते अंधेरी पश्चिम लाईन- २ ए आणि गुंदवली-ओवरीपाडा मेट्रो मार्ग- ७ पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या एकूण संख्येने ३ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. या मार्गावर दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १ लाख ८४ हजार ५२६ इतकी आहे. लवकरच ही आकडेवारी २ लाखांचा टप्पा गाठेल, असा मुंबई मेट्रो रेल कोर्पोरेशनला विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारी २०२३ रोजी मुंबई मेट्रो ७ आणि २ अ चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. मुंबईतील पहिल्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनबरोबर हा मार्ग जोडलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांना पहिले एकत्रित मेट्रो जाळे मिळाल्याने मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला आहे.

मुंबई मेट्रो ७ आणि २ ए चा पहिला टप्पा कार्यरत होताच दररोज १७२ फेऱ्यांद्वारे सरासरी ३०,५०० प्रवासी मेट्रोने प्रवास करीत होते. यामध्ये सर्वाधिक प्रवासी संख्या गुंदवली २०,५००; तर अंधेरी १९,००० अशी आहे.

३५ किमी लांबीच्या या दोन मार्गिका आता पूर्णपणे कार्यरत आहेत आणि मेट्रो लाईन १ (अंधेरी मार्गे वर्सोवा आणि घाटकोपर) बरोबर जोडल्या गेल्या आहेत, ज्यामुळे मुंबई उपनगरात मेट्रोचे पहिले जाळे तयार झाले आहे. याशिवाय मेट्रो १च्या माध्यमातून लोकल रेल्वे मार्गाशी जोडण्यात आल्याने लाखो मुंबईकरांना त्याचा लाभ होत आहे.

आरे आणि धनुकरवाडी दरम्यानचा २० किमीचा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी कार्यान्वित करण्यात आला. तर प्रवासी तिकीट खिडकीवरून किंवा मुंबई वन मोबाईल अॅपद्वारे तिकीट खरेदी करून प्रवास करू शकतात. प्रवासी मुंबई वन कॉमन मोबिलिटी कार्डदेखील वापरू शकतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा