Advertisement

वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ साकारण्यात येणार

बॉलिवूड थीमद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे.

वांद्रे मेट्रो लाईनखाली ‘बॉलीवूड थीम’ साकारण्यात येणार
SHARES

वांद्रे पश्चिम येथून जाणाऱ्या मेट्रो लाईन 2-बीच्या खाली बॉलिवूड थीम साकारण्यात येणार आहे. ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान 7 स्टेशन आहेत. त्यामधील 355 खांब व त्यामधील जागेमध्ये एमएमआरडीएमार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून बॉलीवूड थीम साकारण्यात येणार आहे.

बॉलिवूड थीमद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे. अत्यंत अनोखी अशी ही कल्पना या परिसराचे सौंदर्य तर वाढवणारी ठरणार आहेच शिवाय ती पर्यटकांचे खास आकर्षण ठरेल, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आणि स्थानिक आमदार ॲॅड. आशिष शेलार यांनी दिली.

वांद्रे पश्चिम येथे असणारे बॅन्ड स्टँड, माऊंट मेरी आणि अन्य चर्च, वांद्रे किल्ला, जुन्या आठवणी जपणारे वांद्रे रेल्वे स्टेशनसह हा संपूर्ण परिसर पर्यटकांचे आकर्षण ठरणारा आहे.

बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते याच भागात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्मस्टार यांना पाहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते.

उद्योग-व्यवसाय आणि देशाच्या अर्थकारणामध्ये मोठे योगदान देणाऱ्या बॉलीवूडचा गेल्या 100 वर्षांचा प्रचंड मोठा इतिहास हा या परिसराशी जोडलेला आहे. त्यामुळेच त्याला उजाळा देत या परिसरातून जाणाऱ्या मेट्रो लाईनचे खांब व त्यामधील जागा यावर विशेष पद्धतीने बॉलीवूड थीम साकारण्यात येणार आहे.



हेही वाचा

मुंबईकरांच्या सेवेत अडीच हजार एसी बस लवकरच दाखल होणार

मुंबईतल्या 'या' 20 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा