Advertisement

ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच प्रवाशांच्या भेटीला

कधीपासून होणार सुरुवात?

ठाणे शहरातील पहिली मेट्रो लवकरच प्रवाशांच्या भेटीला
SHARES

वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो 4 अ मार्गावर गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाणे शहराला पहिली मेट्रो मार्गिका या वर्षाच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मेट्रो 4 ही 32.32 किमी तर मेट्रो चार अ ही 2.7 किमी लांबीची मार्गिका आहे. या दोन्ही मार्गिंकांवर मिळून 32 स्थानकं असणार आहेत. तीन टप्प्यात विभागलेला वडाळा ते कासारवडवलीपर्यंत विस्तारित मार्ग जवळपास 80 टक्के पूर्ण झाला आहे. 

कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा पहिला भाग डिसेंबर 2025 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 2026 मध्ये कॅडबरी जंक्शन ते गांधीनगर हा भाग आणि 2027 मध्ये वडाळा हा शेवटचा भाग तयार होईल. कासारवडवली ते  गायमुख यांना जोडणारा ग्रीन लाइन 4 A विस्तार 90 टक्के पूर्ण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस तो सुरू होण्याची शक्यता आहे. 

सध्या गायमुख ते कॅडबरी जंक्शन या मार्गावर मेट्रोच्या ट्रायल रन घेतल्या जाणार असून या पूर्ण झाल्यानंतर आरडीओएसकडून मेट्रो गाड्यांची चाचणी केली जाणार आहे. सर्व तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत ही मेट्रो मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्लान आहे. 

कोणत्या स्थानकांवर मेट्रो धावणार

कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख या स्थानकांवर मेट्रो थांबणार. 



हेही वाचा

एक्वा लाईन 3 मध्ये मोबाईल नेटवर्क गायब, प्रवासी त्रस्त

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा