Advertisement

मुंबई मेट्रोचे कामकाजी तास १ फेब्रुवारीपासून वाढवले

१ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल झालेला असेल.

मुंबई मेट्रोचे कामकाजी तास १ फेब्रुवारीपासून वाढवले
SHARES

मुंबईकरांना सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात चांगल्या बातम्या मिळत आहेत. नुकतंच राज्य सरकारनं सर्व सामान्यांसाठी लोकल ट्रेनचा (Mumbai local) प्रवास सुरू करण्याची मंजूरी दिली आहे. आता मोट्रो प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. मुंबई मेट्रोनं आपल्या वेळेत १ तासाची वाढ केली आहे.

१ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारपासून मुंबई मेट्रोच्या वेळेत बदल झालेला असेल. बदल म्हणजे कामाकाजाच्या वेळेत १ तास वाढवण्यात आला आहे. पहिली मेट्रो सेवा वर्सोवा इथून सकाळी ६.५० आणि घाटकोपर इथून सकाळी ७.१५ वाजता उपलब्ध होईल.

सध्या वर्सोवाहून पहिली ट्रेन सकाळी ७.५० वाजता आणि घाटकोपरसाठी रात्री १०.१५ वाजता शेवटची मेट्रो उपलब्ध आहे. तसंच वर्सोवा इथून शेवटची ट्रेन रात्री ९.५० वाजता आणि घाटकोपरवरून रात्री १०.१५ वाजता सुटते.

TOI शी बोतताना अधिकारीनं सांगितलं की, आता वर्सोवाहून पहिली मेट्रो ६.५० वाजता आणि घाटकोपरहून ७.१५ वाजता सुटेल. त्यानुसार, वर्सोवाहून शेवटची ट्रेन ९.५० वाजता आणि घाटकोपरहून १०.१५ वाजता सुटेल.

मेट्रो ते उपनगरी स्थानकांपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि सुलभ प्रवेशासाठी अंधेरी आणि घाटकोपर इथून रेल्वे एफओबी देखील सुरू करण्यात येतील. याशिवाय अंधेरी (पश्चिम) इथं जाण्यासाठी इच्छुक प्रवाशांसाठी मेट्रो आपल्या अंधेरी स्थानकात नवीन गेट उघडेल, असं मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रथम ट्रेन सुटण्याच्या निर्धारित १५ मिनिटांपूर्वी स्थानकं उघडली जातील.

लॉकडाउननंतर, मुंबई मेट्रो वन सेवा १९ ऑक्टोबर २०२० पासून सुरक्षा प्रोटोकॉलसह सर्वांसाठी सुरू करण्यात आल्या. मुंबईकरांना दिलासा देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी, २९ जानेवारी रोजी जाहीर केलं आहे की, १ फेब्रुवारी, २०२१ पासून सर्वसामान्यांना लोकल गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.

अहवालानुसार रात्री ९ ते सकाळी ७ वाजेपर्यंत रेल्वे सेवा सुरू राहिल. त्यानंतर दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत रेल्वे सेवा सुरु ठेवण्यात येईल.

सरकार आणि रेल्वेनं रेल्वे स्थानकांवर गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना मास्क शिवाय आवारात प्रवेश घेता येणार नाही.



हेही वाचा

आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील बंदी २८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस १४ फेब्रुवारीपासून प्रवाशांच्या सेवेत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा