मेट्रो-१ च्या स्टोअर व्हॅल्यू पास स्मार्टकार्डधारकांना मिळणार कॅशबॅक

एसव्हीपी स्मार्टकार्डकडे आणखी प्रवासी वळावेत आणि त्यांचा मेट्रो प्रवास स्वस्त आणि मस्त व्हावा यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने कॅशबॅक योजना सुरू केली आहे. १ फेब्रुवारीपासून कॅशबॅक योजनेचा शुभारंभ होणार असून याचा नक्कीच मेट्रो प्रवाशांना फायदा होईल असा विश्वास एमएमओपीएलनं व्यक्त केला आहे.

SHARE

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ मार्गानं प्रवास करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मेट्रोला मुंबईकरांची चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळेच दैनंदिन मेट्रोनं प्रवास करणारे प्रवाशी आता पास सुविधेकडेही मोठ्या संख्येने वळू लागले आहेत.परिणामी स्टोअर व्हॅल्यु पास (एसव्हीपी) स्मार्टकार्ड वापरणार्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. तेव्हा या एसव्हीपी स्मार्टकार्डकडे आणखी प्रवासी वळावेत आणि त्यांचा मेट्रो प्रवास स्वस्त आणि मस्त व्हावा यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने कॅशबॅक योजना सुरू केली आहे. १ फेब्रुवारीपासून कॅशबॅक योजनेचा शुभारंभ होणार असून याचा नक्कीच मेट्रो प्रवाशांना फायदा होईल असा विश्वास एमएमओपीएलनं व्यक्त केला आहे. तर मुख्य म्हणजे एसव्हीपी स्मार्टकार्डधारकांना कॅशबॅक देणारी मुंबई मेट्रो-१ ही पहिली मेट्रो ठरली आहे.

सध्या मेट्रो-१ च्या प्रवाशांसाठी स्टोअर व्हॅल्यू पास (एसव्हीपी) रिटर्न जर्नी टोकन (आरजेटी) आणि मंथली ट्रीप पास (एमटीपी) अशा ३ प्रकारे तिकीट सेवा उपलब्ध करून दिली जाते. या तिन्ही सेवेमधून प्रवासी एसव्हीपीला अधिक पसंती देताना दिसतात. त्यामुळेच मेट्रो प्रवाशांच्या एकूण प्रवाशांपैकी एक तृतीयांश प्रवासी हे एसव्हीपी स्मार्टकार्डधारक आहेत. गेल्या वर्षभरात या कार्डधारकांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या सेवेला मिळणारा हा प्रतिसाद लक्षात घेता एसव्हीपी स्मार्टकार्डधारकांसाठी एमएमओपीएलने कॅशबॅक योजना आणली आहे. त्यानुसार २०० रूपयांपासून ६०० रूपयांपर्यंत रिचार्ज करणाऱ्या प्रवाशाला अनुक्रमे २ ते १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही रक्कम तात्काळ प्रवाशांच्या एसव्हीपी कार्डमध्येमध्ये जमा करण्यात येणार असून अशाप्रकारची सुविधा देणारी मेट्रो-१ ही देशातील पहिली मेट्रो ठरणार आहे.


अशी असेल कॅशबॅक


रिचार्ज रक्कम (रू)
कॅशबॅक(टक्केवारीत)
२००
२ टक्के
३००
४ टक्के
४००
६ टक्के
५००
८ टक्के
६०० किंवा त्यापेक्षा जास्त१० टक्केअशी मिळेल कॅशबॅक

प्रत्येक एसव्हीपी स्मार्टकार्डधारकाला रिचार्ज केल्यानंतर लगेचच कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक जमा झाल्यानंतर लगेचच कॅशबॅक मिळणार आहे. कॅशबॅक त्यांच्या ट्रॅव्हल बॅलन्स एवढाच असणार असून त्याचा ते प्रवाशांसाठी उपयोग करू शकणार आहे. दरम्यान १०० रुपयांपर्यंत रिचार्ज करणाऱ्याला कोणताही कॅशबॅक देण्यात येणार नाही. रिचार्जवर मिळालेल्या कॅशबॅकची वैधता सहा महिन्यांपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे ०-२ किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या एसव्हीपी कार्ड धारकांना ही कॅशबॅक सुविधा लागू होणार आहे.

दरम्यान मेट्रो प्रशासनानं एकीकडे कॅशबॅक सुविधा दिली असली तरी स्मार्टकार्डच्या रक्कमेत मात्र २५ ते ५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळं प्रत्येक फेरीमागे ५५ पैसे ते १.११ रुपयांची वाढ झाली आहे. यानुसार २ ते ५ किमी प्रवाशांना ७७५ रुपये, ५ ते ८ किमीच्या प्रवाशांना ११०० रुपये, ८ किंवा त्यापेक्षा अधिक किमीसाठी १३७५ रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु दिलासादायक बाब म्हणजे किमान किंमतीपेक्षा ही रक्कम कमी असणार आहे. त्यामुळं स्मार्टकार्ड धारकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे.हेही वाचा -

पेंग्विननंतर आता राणीबागेत ३ डी थिएटर

टी-२० वर्ल्ड कपच वेळापत्रक जाहीर, पण भारत, पाकिस्तान संघ वेगवेगळ्या गटातसंबंधित विषय
ताज्या बातम्या