Advertisement

वाशी-पुणे शिवनेरी सेवा बंद, एसटी महामंडळाचा निर्णय

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे एसटी महामंडळाने अवघ्या दोन दिवसांत ही सेवा बंद केली.

वाशी-पुणे शिवनेरी सेवा बंद, एसटी महामंडळाचा निर्णय
SHARES

वाशी-पुणे शिवनेरी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने घेतला आहे.

ठाणे-दादरवरून पुणे येथे जाणाऱ्या शिवनेरी प्रवाशांनी भरून येतात. यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांना आसन मिळत नाही.

नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी वाशी-स्वारगेट (पुणे) शिवनेरी सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला होता. ८ मे रोजी वाशीवरून शिवनेरी सुरू करण्यात आली.

मात्र, मुंबई विभागाने प्रवाशांना या गाडीची माहिती ९ मे रोजी दिली. एखाद्या मार्गावर शिवनेरीसारखी सेवा सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असताना महामंडळाकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत.

गाडी सुरू झाल्याच्या एक-दोन दिवसांनंतर प्रवाशांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत गाडी रिकामी धावत असल्याचे सांगत सेवा बंद करण्यात आली.

प्रवाशांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच गाडी बंद झाल्याने मुंबई विभागाच्या कामगिरीवर एसटी प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठाणे-पुणे मार्गावर ई-शिवनेरी सुरू झाली आहे. आठ वर्षांवरील शिवनेरी मुंबई बाहेर चालवण्याचे धोरण आहे. यामुळे वाशी-स्वारगेट मार्गावर डिझेलवरील शिवनेरी सुरू करण्यात आली होती. मात्र, प्रवासी प्रतिसाद नसल्याने या मार्गावरील सेवा बंद करण्यात आल्या असून पुणे विभागाकडे शिवनेरी गाड्या देण्यात आल्या आहेत, असे स्पष्टीकरण महामंडळाने दिले.



हेही वाचा

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा